सध्याच्या जगात सुंदर दिसण्याची आणि चांगली शरीरयष्टी मिळवण्याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्याचा परिणाम लहान मुलांवरही दिसून येत आहे.(social media cosmetic surgery risks) सोशल मीडियावर दिसणारे परफेक्ट फिगर, सेलिब्रिटींचे ग्लॅमरस लूक्स आणि समाजातील एकमेकांबद्दल वाढणारी तुलना यामुळे अनेक तरुण-तरुणींमध्ये सौंदर्यासाठी धडपड सुरु आहे. (teen breast enlargement dangers)
आजकाल सोशल मीडियामुळे लहान वयातच मुलं स्वत:ला प्रौढ समजतात, ज्यामुळे जगण्याचा सगळ्यात जास्त धोका वाढतो.(14-year-old girl dies cosmetic surgery) मेक्सिकन मधल्या एका मुलीने असंच काही केलं.(Mexico teen surgery death) १४ वर्षांच्या मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिचा मृत्यू आजाराने झाला.(dangers of cosmetic surgery for teens) पण अंत्यसंस्काराच्या वेळी वडिलांनी मृतदेहाची बारकराईने तपासणी केली तेव्हा त्यांना काही तरी वेगळेच घडल्याचे लक्षात आले. (plastic surgery complications in minors)
मुलांचे केस लहान वयात गळतात-पांढरे होतात? डॉक्टरांनी सांगितलं कारणं- पालकांनो वेळीच द्या लक्ष
मेक्सिकोतील डुरंगो येथे एक धक्कादायक घटना घडली. चौदा वर्षांची पालोमा निकोल अरेलानो एस्कोबेडो हिचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्याचे कारण श्वास घेण्यास अडचण झाली. परंतु, तिच्या वडिलांनी हे कारण फेटाळून लावले. त्यांचा आरोप असा आहे की, मुलीचा मृत्यू वाढत्या स्तन शस्त्रक्रियेमुळे झाला. ज्याविषयी अंत्यसंस्कारादरम्यान समजले. पालोमाचा मृत्यू २० सप्टेंबर रोजी झाला. वडिलांनी असं सांगितलं की, हॉस्पिटलने मृत्यूचे कारण आजार दर्शविले. पण दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कारावेळी मुलीच्या शरीरावर इम्प्लांट्स आणि शस्त्रक्रियेचे ओळ पाहिल्यानंतर त्यांना समजले.
वडीलांनी सांगितलं की, मृत्यूचे खरं कारण लपविण्यासाठी खोटे मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले. ते म्हणतात माझ्या मुलीचा मृत्यू आजाराने नाही तर बेकायदेशीर स्तन शस्त्रक्रियेमुळे झाला. याला जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई करावी. आणि लवकरात लवकर सत्य बाहेर यावे. कार्लोस यांनी अंत्यसंस्कारानंतर लगेच पोलिस तक्रार केली. संबंधित प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. पण कॉस्मेटिक सर्जरीने जीव गमावण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील अनेकांनी स्तन वाढवण्याच्या नादात आपला जीव गमावला आहे.