मुली साधारण १३- १४ वर्षांच्या झाल्या की त्यांचं आरशामध्ये स्वत:ला पाहण्याचं प्रमाण एकदमच वाढून जातं. येता जाता त्या आरशात डोकावून पाहतात. आजवर कधीही आपण कसे दिसतो आहोत, याची काळजी न करणाऱ्या मुली वाढत्या वयाच्या झाल्या की स्वत:च्या दिसण्याबाबत जास्तच जागरुक होतात. त्यांची हेअरस्टाईल, कपड्यांचा चॉईस यातही बदल होत जातो. आणि बहुतांश मुलींच्या डाेक्यात त्याच काळात आपण किती वाईट दिसतो, आपण अजिबातच सुंदर नाही, आपण खूपच कशातरीच दिसतो असे किडे वळवळायला लागतात. यातून कित्येक मुलींचा कॉन्फिडन्स तर जातोच पण त्यांचं अभ्यासातही लक्ष लागत नाही. अशीच अवस्था झाली हाेती अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty Reveals Her Childhood Memories). ती म्हणे स्वत:ला कुरूप (ugly) म्हणून रोज खूप रडायची.. बघा काय सांगतेय ती याविषयी...
शिल्पा शेट्टीच्या एका मुलाखतीचा एक छोटासा भाग successdrivenchampion या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शिल्पा म्हणते की अगदी १७- १८ वर्षांची होईपर्यंत ती रोज रडायची. रडण्यामागचं कारण हेच की आपण किती कुरूप दिसतो आहोत असं वाटायचं.
फक्त ५०० रुपयांत घ्या स्टायलिश लॅपटॉप बॅग, वजनाला हलकी आणि भरपूर टिकाऊ
तिला असं रडताना पाहिलं की तिची आई तिला नेहमी बदकांमध्ये राहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र राजहंसाच्या गोष्टीची आठवण करून द्यायची. तू कुरूप नाहीस, तुझ्याकडे खूप क्षमता आहेत आणि त्यातूनच तू खूप सुंदर होणार आहेस, असं आई वारंवार मनावर बिंबवायची. त्यामुळेच डोक्यात ते विचार येणं कमी झालं, आत्मविश्वास वाढत गेला.
तुम्हाला स्ट्राँग बनविण्यासाठी तुमच्या आसपास कोणीतरी अशीच स्ट्राँग व्यक्ती असणं गरजेचं असतं आणि माझ्यासाठी ती व्यक्ती म्हणजे माझी आई होती, असं शिल्पा सांगते. वाढत्या वयातल्या मुलींना शिल्पाने एक खास सल्ला दिला आहे. ती म्हणते की तुमचा आत्मविश्वास कुठेही कमी होऊ देऊ नका.
उरलेल्या साबणाचे तुकडे फेकू नका, बघा ५ एकदम भन्नाट आयडिया, घर- कपाट होईल सुगंधी
मनातून आनंदी राहा. तुमचा आनंद आणि तुमचा आत्मविश्वास या दोन गोष्टी तुम्हाला सुंदर बनवतात. सुंदरतेच्या कोणत्याही प्रचलित साच्यांमध्ये स्वत:ला अडकवून घेऊ नका. तुम्ही तुमचं वेगळं उदाहरण तयार करून लोकांसमोर ठेवा. आपणही छान दिसावं असं वाटणं खूप साहजिक आहे. पण सुंदरतेच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तुम्ही जशा आहात तशा सुंदरच आहात, यावर विश्वास ठेवा आणि मस्त राहा..