Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shefali Jariwala Death: अखेर शेफाली जरीवालाची 'ही' इच्छा झाली पूर्ण, म्हणाली होती मला मरेपर्यंत... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2025 10:30 IST

Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अशी ओळख असणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने तिचे चाहते सुन्न झाले आहेत...

ठळक मुद्देतिचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. कारण या व्हिडिओतून शेफालीची एक इच्छा पुर्ण झाल्याचं दिसून येतंय आणि ते तिच्या चाहत्यांनी अचूक हेरलंय..

कोणाला कधी, कुठे आणि कसा हार्ट ॲटॅक येईल काहीच सांगता येत नाही, हे पुन्हा एकदा शेफाली जरीवालाच्या निधनाने अधोरेखित झाले आहे. काही दिवसांपुर्वीच करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचेही गोल्फ खेळताना अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यापाठोपाठ आता लगेच शेफाली जरीवालाच्या निधनाचे वृत्त आले. एकानंतर एक घडलेल्या या दोन्ही घटना अतिशय क्लेषदायी असून बॉलीवूडसह जनसामान्यांनाही हेलावून टाकणाऱ्या आहेत. 

 

शेफाली जरीवाला हे नाव आता तिशी- चाळिशीत असणाऱ्या पिढीतल्या प्रत्येकालाचा माहिती आहे.. कारण २००२ साली तिचे 'कांटा लगा' हे गाणे आले आणि पाहता पाहता शेफालीने त्यावेळच्या तरुणाईची मनं जिंकून घेतली. त्या गाण्याच्या ओळी आजही अनेकांच्या ओठावर आहेत.

घरात काळजी घेताच, पण घराबाहेर गेल्यानंतर मुलांना डास चावू नये म्हणून ५ टिप्स- मुलं सुरक्षित..

त्या गाण्यात दिसून आलेलं शेफालीचं सौंदर्य त्यावेळी खूप चर्चेत होतं. 'कांटा लगा' या गाण्याने तिला खरी ओळख मिळवून दिली आणि तेव्हापासूनच ती 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली. या तिच्या नव्या ओळखीविषयी तिला विचारलं असता तिने जे उत्तर दिलं होतं, तो तिचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. कारण या व्हिडिओतून शेफालीची एक इच्छा पुर्ण झाल्याचं दिसून येतंय आणि ते तिच्या चाहत्यांनी अचूक हेरलंय..

 

व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एका मुलाखतीदरम्यान तिला विचारलं गेलं की तुला सगळेच 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखत आहेत. हीच तुझी ओळख झाली आहे आणि ती तुला आवडतेय का?

डॉक्टर सांगतात पावसाळ्यात पाव-ब्रेड खाणं टाळा; त्यामुळे वाढतोय 'हा' आजार मोठ्या प्रमाणात

यावर शेफाली म्हणाली की अर्थातच मला ते खूप आवडतंय.. अख्ख्या जगात 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखली जाणारी एकच मुलगी आहे आणि ती मी आहे.. मला तर मरेपर्यंत माझी हीच ओळख राहावी असं वाटतं.. शेफालीची ही इच्छा शेवटी पुर्ण झाली असून आजही ती 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखली जात आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलशेफाली जरीवालाहृदयविकाराचा झटका