Lokmat Sakhi >Social Viral > सफाई कामगार आईबाबांसाठी तिनं मिस युनिव्हर्स स्पर्धेत उचललं धाडसी पाऊल, अभिमानानं मिरवला कचरा कारण..

सफाई कामगार आईबाबांसाठी तिनं मिस युनिव्हर्स स्पर्धेत उचललं धाडसी पाऊल, अभिमानानं मिरवला कचरा कारण..

she wore a dress made of bottle caps at the Miss Universe competition : मिस थायलंडला म्हणतात गार्बेज क्विन जाणून घ्या कारण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 18:59 IST2025-02-17T18:42:16+5:302025-02-17T18:59:31+5:30

she wore a dress made of bottle caps at the Miss Universe competition : मिस थायलंडला म्हणतात गार्बेज क्विन जाणून घ्या कारण.

she wore a dress made of bottle caps at the Miss Universe competition | सफाई कामगार आईबाबांसाठी तिनं मिस युनिव्हर्स स्पर्धेत उचललं धाडसी पाऊल, अभिमानानं मिरवला कचरा कारण..

सफाई कामगार आईबाबांसाठी तिनं मिस युनिव्हर्स स्पर्धेत उचललं धाडसी पाऊल, अभिमानानं मिरवला कचरा कारण..

ब्यूटीपिजंटच्या विविध स्पर्धा जगभरात होत असतात. सौदर्यवतींनी भरलेली अशी ही स्पर्धा असते. (she wore a dress made of bottle caps at the Miss Universe competition)पण काही जणी दिसायला जेवढ्या सुंदर असतात, त्याहून जास्त त्यांचे विचार सुंदर असतात. असे स्पर्धक प्रतिस्पर्धिंचेही मन  जिंकतात. त्यांच्या विचारात तेवढी ताकद असते. (she wore a dress made of bottle caps at the Miss Universe competition) त्यांच्या वैविध्यासाठी ते ओळखले जातात. असंस काहीसं मिस युनिव्हर्स पिजंटमध्ये घडले होते. 

विविध देशातील सौदर्यवतींनी तेथे हजेरी लावली होती. त्यात ॲना सुएंगम-आयमने हिचाही सहभाग होता. (she wore a dress made of bottle caps at the Miss Universe competition)ती २०२२ ची मिस थायलंड ठरली होती. त्यामुळे मिस युनिव्हर्स २०२२ मध्ये ती थायलंडचे प्रतिनिधित्व करत होती. ती मिस युनिव्हर्सची पदवी जिंकली नाही. पण तिच्या ड्रेसने लोकांचे मन जिंकले होते.   

ॲनाने मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत घातलेला ड्रेस हा कापडापासून तयार केलेला नव्हता. तर तो अॅल्युमिनियमच्या झाकणांपासून तयार केलेला होता. वापरून झालेल्या बाटल्यांची झाकणे जी टाकून दिली जातात त्यापासून तो ड्रेस तयार केलेला होता. ॲना सुएंगम-आयमचा ड्रेस तिच्या आईवडीलांसाठी तिने घातला होता. पॉवर ऑफ युनिटी बद्दलचा संदेश ती देत होती.       

त्या ड्रेसला 'हिडन प्रेशिअस डायमंड ड्रेस' असे संबोधले गेले होते. थायलंडमधल्या नामवंत फॅशन डिझाइन ब्रॉण्ड मनिरत यांमार्फत तो ड्रेस तयार केला गेला होता. शंभराहून अधिक सोडा बॉटलच्या झाकणांचा वापर केला गेला होता. असे ॲनाने तिच्या इंस्टाग्रामच्या पेजवरून सांगितले होते.    

ॲनाचे बालपण एका कचरा गोळा करणाऱ्या कुटुंबात गेले. तिचे आई-बाबा कचरा गोळा करून घर चालवत होते. तिने फार कष्टाने स्वत:ची ओळख तयार केली. तिच्या आईबाबांप्रति तिचा आदर दर्शवण्यासाठी ॲनाने तो ड्रेस घातला होता. ॲनाला गाब्रेजक्विन असे संबोधले गेले.

लहानपणी ॲनाला एका बुद्धीस्ट शाळेत पाठवण्यात आले होते. तिने सांगितल्यानुसार, मेरीट पॉईंट्स मिळवण्यासाठी तिला रक्तदान करावे लागायचे. तसेच सफाई कामगार म्हणून काम करावे लागायचे. कचरा गोळा करायला लागायचा. अशी सगळी कामं करून तिने शाळा व महाविद्यालयाची फी भरली होती. आता ती गरीब मुलांना चांगले आयुष्य मिळवून देण्यासाठी समाजसेवा करते.  

Web Title: she wore a dress made of bottle caps at the Miss Universe competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.