Join us  

शर्मिला टागोर म्हणतात, लग्न केलं-मुलं झाली- बिकिनीही घातली म्हणून लोकांनी नावं ठेवली पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 2:56 PM

Sharmila Tagore And Her Decisions: शर्मिला टागोर सांगत आहेत त्यांच्या बिंधास्त स्वभावाविषयी आणि त्यांनी घेतलेल्या बेधडक निर्णयांविषयी.... बघा त्यांनी नेमकं काय केलं होतं....

ठळक मुद्देशर्मिला टागोर म्हणतात मलाही अनेक सल्ले मिळाले. पण मी तेच केलं जे मला करायचं होतं.

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांच्याविषयीचे काही किस्से, त्यांनी घेतलेले बेधडक निर्णय असं बरंच काही एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्या म्हणतात की महिला बऱ्याचदा त्यांचा आतला आवाज ऐकत नाही. तो आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. दुसरं म्हणजे महिलांचं मन वळवणं खूप सोपं असतं. काही जणांना ते सहज जमतं. त्यामुळे मग बऱ्याच जणींचं सगळं जीवन दुसऱ्यांचे सल्ले ऐकण्यात आणि त्यानुसार वागण्यात संपून जातं. मलाही अनेक सल्ले मिळाले (Sharmila Tagore And Her Decisions). पण मी तेच केलं जे मला करायचं होतं. कारण दुसऱ्यांनी दिलेले सल्ले मला कधीच आवडले नाहीत...

 

The Quorum येथे नुकताच एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणाईशी संवाद साधण्यासाठी अभिनेत्री शर्मिला टागोर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

डोसा- इडलीचं पीठ फ्रिजमध्ये ठेवून आठवडाभर खाता? तब्येतीवर होऊ शकतो वाईट परिणाम, कारण....

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की माझ्या स्वत:च्या अनुभवावरून एक गोष्ट मी पक्की शिकले आहे, ती म्हणजे कधीच कोणाला सल्ला द्यायला जाऊ नये. कारण एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असताे. त्यानुसार तो त्याचे निर्णय घेतो. माझंही असंच होतं. मी लग्न करण्याचा, मुलं होऊ देण्याचा, बिकीनी घालण्याचा निर्णय घेतला. मला या बाबतीत अनेक सल्ले मिळाले. पण मला ते फार आवडले नाहीत. 

 

कारण मला हे पक्कं माहिती होतं की बिकीनी घालण्याचं, लग्न करण्याचं किंवा मुलं होऊ देण्याची एक ठराविक वेळ असते. त्यामुळे वेळेचं महत्त्व लक्षात घ्या. परिस्थितीनुसार गरज पडली आणि स्वत:ला वाटलं तर स्वत:ला बदला.

दांडियासाठी इंडो- वेस्टर्न लूक करायचाय? बघा ६ हटके लूक, दिसा स्टायलिश आणि फॅशनेबल

पण आजुबाजुच्या लोकांकडून, परिस्थितीकडून नेहमी शिकत राहा. बॉलीवूडमध्ये येऊ पाहण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणाईला उद्देशून त्या म्हणाल्या की या दुनियेची फक्त चमकधमक तुम्हाला दिसते. पण तेवढाच कठीण संघर्ष इथे टिकून राहण्यासाठी करावा लागतो, हे देखील लक्षात घ्या. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलशर्मिला टागोरबॉलिवूड