Join us  

दिवाळीसाठी मीरा कपूरने बनवलेल्या काजू कतलीचे फोटो व्हायरल, काय आहे त्या काजू कतलीत स्पेशल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 1:29 PM

Kaju Katli by Mira Rajput Kapoor: दिवाळीसाठी आपण जसे आपल्या घरी वेगवेगळे पदार्थ करतो, तसेच सेलिब्रिटीही त्यांच्या घरी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतात. बघा हा अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर हिने केलेला प्रयोग.

ठळक मुद्देसणासुदीच्या दिवसांत किंवा काही खास क्षणी सेलिब्रिटीही त्यांच्या स्वयंपाक घरात रमतात आणि वेगवेगळे पदार्थ करताना दिसतात. तसंच काहीसं मीराचं झालं आहे.

मीरा कपूर (Mira Rajput Kapoor) सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. कधी तिच्या सहलींची तर कधी तिच्या फिटनेस आणि ब्यूटी टिप्सची सोशल मिडियावर चर्चा असते. तिचा फॅशन सेन्सही जबरदस्त असल्याने सोशल मिडियावर तिचे फॅन फाॅलोईंगही चांगलेच आहे. याशिवाय मीरा अतिशय फूडी असून वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतानाचे फोटोही ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता सध्या मीराने असाच एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे (kaju katli recipe).

 

पण या फोटोची खासियत अशी की त्यामध्ये मीरा एखाद्या पदार्थाचा आस्वाद घेताना नाही, तर तो पदार्थ करताना दिसत आहे. सणासुदीच्या दिवसांत किंवा काही खास क्षणी सेलिब्रिटीही त्यांच्या स्वयंपाक घरात रमतात आणि वेगवेगळे पदार्थ करताना दिसतात. तसंच काहीसं मीराचं झालं आहे. मीराने इन्स्टाग्रामवर जी पोस्ट शेअर केली आहे, त्यात ती तो पदार्थ करण्यात अगदी तल्लीन झाल्याचं दिसून येतं. "Chulha jalana and all" अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली असून #throwback असंही तिने म्हटलं आहे. या फोटोनंतर तिने एक इन्स्टाग्राम स्टोरीही शेअर केली होती आणि त्यात तिने काजू कतलीचा एक फोटो टाकला हाेता. हे दोन्ही फोटो पाहून मीराने दिवाळीसाठी काजू कतली केली होती की काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. 

 

आता मीराने नेमकी कोणत्या पद्धतीने आणि कशी काजू कतली बनवली, याबाबत तिने काहीही माहिती शेअर केलेली नाही. पण तिचे हे फोटो पाहून तुम्हालाही स्वत:साठी, घरातल्या इतर मंडळींसाठी काजू कतली करावी वाटली, तर बघा काजू कतली करण्याची ही खास रेसिपी.

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलमीरा राजपूतअन्नपाककृतीदिवाळी 2022