Join us
Daily Top 2Weekly Top 5

झुरळांचा बंदोबस्त करण्यासाठी वाटीभर पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे काही थेंब - झुरळं पळतील लांब, विषारी खडू विसरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2026 10:07 IST

secret trick to get rid of cockroaches : neem oil for cockroaches : get rid of cockroaches naturally : natural cockroach control at home : घरांतील झुरळांना पळवून लावण्यासाठी असरदार आणि खिशाला परवडेल असा उपाय...

घराच्या कानाकोपऱ्यात सतत झुरळांचा वावर असणे ही अनेक घरांची मोठी समस्या आहे. घर कितीही स्वच्छ ठेवले तरी कधीकधी किचनच्या ओट्याखाली, कपाटांच्या मागे किंवा बेसिनच्या पाईपमधून झुरळं शिरकाव करतातच. एकदा का घरात झुरळांचा शिरकाव झाला की, त्यांची संख्या इतक्या वेगाने वाढते की त्यांना आवरणे कठीण होते. घरात वारंवार इकडे - तिकडे फिरणारी झुरळं दिसू लागली की, घराची स्वच्छता आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. कितीही स्वच्छता केली तरी ओलाव्याच्या जागेत ही झुरळं आपले घर करतातच(secret trick to get rid of cockroaches).

झुरळांना घरांतून पळवून लावण्यासाठी केमिकलयुक्त फवारण्या किंवा कीटकनाशके वापरल्याने झुरळं तात्पुरती कमी तर होतात, पण या केमिकलयुक्त फवारण्यांचे वास आणि दुष्परिणाम त्रासदायक ठरू शकतात. अशावेळी सुरक्षित, स्वस्त आणि साधेसोपे असे घरगुती उपाय उपयोगी ठरतात. घरात सहज उपलब्ध (neem oil for cockroaches) असलेल्या पदार्थांच्या मदतीने झुरळांचा कायमचा बंदोबस्त करता येतो. जर तुम्हीही रात्री किचनचा दिवा लावताच पळणाऱ्या झुरळांना कंटाळला असाल, तर आता महागड्या पेस्ट कंट्रोलची गरज नाही. तुमच्या घरातील काही नैसर्गिक गोष्टीच या झुरळांना घरांतून पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. झुरळांना घराबाहेर (natural cockroach control at home) पळवून लावण्यासाठी सर्वात सोपा आणि घरगुती खात्रीशीर उपाय नेमका कोणता ते पाहूयात... 

घरांतील झुरळांना पळवून लावण्याचा घरगुती उपाय... 

कडूलिंबाचे तेल :- कडुलिंबामध्ये 'अझाडिराक्टिन' (Azadirachtin) नावाचा घटक असतो, जो झुरळांची प्रजनन क्षमता रोखतो आणि त्यांना घरापासून दूर ठेवतो. कडुलिंबाच्या तेलाचा उग्र वास झुरळांना अजिबात सहन होत नाही. अंकुर नंदन यांच्या मते, बाजारात मिळणाऱ्या विषारी स्प्रेच्या तुलनेत कडुलिंबाचे तेल माणसे आणि पाळीव प्राण्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. झुरळांसाठी हानिकारक असलेल्या कडुलिंबाच्या तेलात असलेले 'अझाडिराक्टिन' झुरळांच्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. बाजारातील रासायनिक उत्पादनांऐवजी हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आहे, जो घरातील लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना कोणताही त्रास होऊ देत नाही. जर तुमच्याकडे कडुलिंबाचे तेल नसेल, तर तुम्ही कडुलिंबाच्या ताज्या किंवा वाळलेल्या पानांचाही वापर करू शकता. कडुलिंबाच्या पानांची एक जुडी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात किंवा धान्याच्या डब्यांजवळ ठेवा. या पानांचा कडवट वास झुरळांसाठी अडथळ्यासारखे काम करतो, जो ओलांडणे झुरळांसाठी कठीण असते.

'AI' वर तयार केला फोटो, मग म्हणाली आई, हाच तुझा जावई!  मुलीने आईसोबत केला असा प्रँक की...पाहा व्हायरल व्हिडिओ...

त्वचेवर येईल काचेसारखा लखलखता ग्लो फक्त ५ रुपयांत! पार्लरचे हजारो रुपये वाचतील - त्वचा दिसेल ग्लोईंग...

अंकुर नंदन यांनी एक अतिशय सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात शुद्ध कडुलिंबाच्या तेलाचे १० ते १५ थेंब मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून घ्या. जिथे झुरळं जास्त प्रमाणात दिसतात, जसे की सिंकच्या खाली, कपाटांच्या मागे आणि फ्रिजच्या खाली, अशा ठिकाणी या मिश्रणाचा फवारा मारा.

झुरळं ही प्रामुख्याने निशाचर असल्याने रात्रीच्या वेळी त्यांचा वावर वाढतो. त्यामुळे रात्री किचनमधील कामे आटोपल्यानंतर आणि भांडी घासून झाल्यावर हा स्प्रे मारणे अत्यंत फायदेशीर ठरते. झुरळं रात्रीच्या वेळी सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात. अंकुर नंदन यांच्या सल्ल्यानुसार, कडुलिंबाच्या मिश्रणाचा स्प्रे रात्री झोपण्यापूर्वी करावा. स्वयंपाकघराची स्वच्छता केल्यानंतर गॅस शेगडीच्या खाली आणि बेसिन - सिंक जवळ स्प्रे केल्यास रात्रभर झुरळं घरात शिरकाव करू शकणार नाहीत.

चटणीचीही गरज नाही, इतका चविष्ट लागतो 'टोमॅटो डोसा'! होईल झटपट, वाटीभर टोमॅटोचा लालचुटुक - कुरकुरीत डोसा... 

झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त स्प्रे पुरेसा ठरणार नाही, तर तुम्हाला साफसफाईवरही विशेष लक्ष द्यावे लागेल; कारण झुरळं अस्वच्छतेकडे आकर्षित होतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी सिंकमध्ये उष्टी भांडी तशीच ठेवू नका आणि जमिनीवर अन्नाचे कण सांडू देऊ नका. कडुलिंबाच्या स्प्रे सोबतच जर घरातील भिंतींच्या किंवा फरशीच्या भेगा भरून काढल्या, तर झुरळांचे पुन्हा येणे अशक्य होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Neem oil: Natural way to get rid of cockroaches effectively.

Web Summary : Tired of cockroaches? Neem oil offers a safe, natural solution. Its azadirachtin content disrupts cockroach reproduction. Mix neem oil with water, spray in problem areas nightly after cleaning. Maintain cleanliness for best results.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी