कितीही पळवून लावले तरी देखील उंदीर वारंवार घरात येऊन थैमान घालतात. एकदा का घरात उंदीर आले तर त्यांना घराबाहेर काढता काढता आपलीच दमछाक होते. घरात आलेले उंदीर घरभर सर्वत्र फिरून नुसता धुडगूस घालतात. किचन, बेडरुम, बाल्कनी अशी घरातील एकही जागा मोकळी सोडत नाहीत, तर घराच्या कानाकोपऱ्यात फिरुन आपल्या वस्तूंची नासधूस करतात. इतकेच नाही तर घरात उंदरांचा वावर असल्याने घाण आणि रोगराई पसरण्याचा धोका देखील अधिक असतो. घरातील उंदरांना घराबाहेर पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, परंतु गोळ्या, औषध यांची फवारणी करूनही बरेचदा उंदीर पुन्हा घरात येतात. अशा परिस्थितीत, उंदरांना कायमचे घराबाहेर पळवून लावण्यासाठी काहीतरी ठोस व असरदार उपाय करणे गरजेचे असते(Natural methods to stop rats entering house).
घरातील उंदरांना कायमचे घराबाहेर पळवून लावण्यासाठी योग गुरु कैलाश बिश्नोई यांनी एक नैसर्गिक आणि स्वस्त घरगुती उपाय सुचवला आहे. हा उपाय उंदरांच्या वासाची आणि पचनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे, जेणेकरून ते तुमच्या घरातून दूर पळून जातील आणि परत फिरकणार देखील नाहीत. या उपायासाठी आपल्याला घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घरगुती पदार्थांचाच वापर करायचा आहे, यामुळे उंदरांना घरातून पळवून लावण्याचा हा उपाय खिशाला (How to remove rats from home naturally) परवडेल असाच आहे. उंदरांना घरातून कायमचे पळवून लावण्यासाठी नेमका घरगुती उपाय काय करता येईल ते पाहा.
घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी खास घरगुती उपाय...
बेकिंग सोडा आणि इनो पावडर :- बेकिंग सोडा आणि इनो पावडर हे दोन्ही घटक उंदरांच्या पचनसंस्थेवर वाईट रीतीने परिणाम करतात, ज्यामुळे ते त्या ठिकाणाहून दूर पळून जातात. कारण, बेकिंग सोडा आणि ईनो पावडरमध्ये सायट्रिक अॅसिड आणि सोडियम बायकार्बोनेट असते. ही पावडर आर्द्रता किंवा अॅसिडच्या संपर्कात आल्यास वेगाने गॅस तयार करतात, ज्यामुळे उंदरांना खूप अस्वस्थता जाणवते.
केळं :- उंदीर केळ्याच्या गोड आणि तीव्र वासाने सहजपणे आकर्षित होतात. तुम्ही केळं सोलून त्याचे गोल-गोल तुकडे करून घ्या. हे स्लाइस या खास उपायासाठी एक चांगला बेस देतात, ज्यावर पावडर चिकटून राहते. केळ्याचा वास उंदरांना त्या जागेपर्यंत खेचून आणतो, जिथे त्यांना पावडर मिसळलेले मिश्रण मिळते.
फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...
हळद :- हळदीचा तीव्र आणि तिखट वास उंदरांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतो. हळदीची चव आणि वास मिश्रणाची नैसर्गिक तीव्रता वाढवते.
उपाय कसा करायचा ?
उंदरांना पळवून लावण्यासाठी सर्वातआधी केळ्याचे गोलाकार काप किंवा गोल चकत्या कापून घ्याव्यात. मग या केळ्याच्या कापांवर इनो पावडर, बेकिंग सोडा आणि हळद भुरभुरवून घालावी. आता या केळ्याच्या स्लाइस त्या जागांवर ठेवा, जिथे उंदीर सर्वात जास्त दिसतात. हे मिश्रण नेहमी लहान मुले आणि पाळीव प्राणी यांच्यापासून दूर ठेवावे. वापरल्यानंतर सकाळी हे तुकडे काळजीपूर्वक काढून टाका. जेव्हा उंदीर हे मिश्रण खातील, तेव्हा त्यांच्या पोटात गॅस तयार होईल आणि त्यांना अस्वस्थता जाणवू लागेल. उंदरांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. एकदा त्यांना या मिश्रणामुळे तीव्र अस्वस्थता जाणवली की, ते त्या घराला किंवा जागेला धोक्याची जागा मानतात. आणि, पुन्हा घरात येण्याचे धाडस करत नाहीत.
Web Summary : Tired of rats? A simple home remedy using banana, baking soda, turmeric, and Eno powder can help eliminate them for good by disrupting their digestion and creating an unpleasant environment.
Web Summary : चूहों से परेशान हैं? केला, बेकिंग सोडा, हल्दी और ईनो पाउडर का एक सरल घरेलू उपाय उनके पाचन को बाधित करके और एक अप्रिय वातावरण बनाकर उन्हें हमेशा के लिए खत्म करने में मदद कर सकता है।