मोठंमोठे बॉलिवूड सेलिब्रिटीज म्हटलं की त्यांचा थाटमाट भारीच असतो. त्यांच्या सगळ्याच वस्तू या ब्रँडेड, महागड्या आणि लग्जरीयस असतात. या सेलिब्रिटीजच्या कपड्यांपासून ते गाड्यांपर्यंत सगळ्याचं वस्तू या भारी आणि किमती असतात. याचबरोबर, त्यांचे शौक, आवड हे देखील अगदी उंची आणि भन्नाट असतात. परंतु बॉलिवूडची स्टार किड असणारी सारा अली खान (Sara Ali Khan) मात्र स्वतःला 'कंजूष सेलिब्रिटी' म्हणते(Sara Ali Khan's mom Amrita Singh manages her finances).
अनेकदा आपण आपल्या समोरच्या व्यक्तीला पैसे खर्च करायचे नसेल किंवा पैश्यांसाठी हात आखडता घेतलेला पाहिला की, थेट कंजूष म्हणून खिल्ली उडवतो. परंतु त्या व्यक्ती कंजूष नसून पैशाचा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने विचार करुन वापरणाऱ्या असतात. अशीच काहीशी सवय सारा अली खान हिला देखील आहे. नुकतेच दिल्ली येथे सुरु असणाऱ्या (Times Now Summit 2025) टाइम्स नाऊ समिट २०२५ या इव्हेंट दरम्यान ती म्हणाली, " मी काटकसर करणारी आहे आणि माझे पैसे कुठे खर्च करायचे याबद्दल जाणकार आहे. मला विनाकारण पैसे उधळायला आवडत नाही, पण गरजेनुसार थोडेफार खर्च करते". (Sara Ali Khan REVEALS Mother Amrita Singh Handles Her Money).
मग सारा नेमकं या पैशांच करते काय...
साराला प्रवासाची खूप आवड आहे, त्यामुळे ती त्यासाठी पैसे साठवते. ती म्हणते, मला केवळ दिखाव्यासाठी गोष्टी नको असतात. केवळ नावासाठी लक्झरी वस्तू खरेदी करणे मला आवडत नाही, पण खरंच गरज आणि उपयोगी गोष्ट असेल तर त्याशी मी खर्च करते. पुढे सारा म्हणते माझ्याकडे हर्मेसची ब्रँडेड बॅग नाही, पण माझ्या आईकडे आहे, आणि मी ती कधीकधी वापरते. मात्र, एक दिवस माझी चॅनेल बॅग खरेदी करण्याची इच्छा आहे. पण जर तुम्ही झारासारख्या ब्रँडमध्येही कंफर्टेबल असाल, तर ते देखील उत्तम आहे! जर तुम्हाला महागड्या वस्तू खरंच परवडू शकत असतील, तर नक्कीच घ्या."
पुढे आपल्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दल सांगताना सराने एक अनोखी गोष्ट उघड केली की, "मी एक गोष्ट शिकली आहे की, थोडे थोडे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवायला हवेत. माझी आईच माझे संपूर्ण आर्थिक व्यवस्थापन पाहते. माझा Google Pay अकाउंट देखील तिच्या मोबाईलशी लिंक आहे आणि माझे OTPs तिला येतात. त्यामुळे मला कुठलेही आर्थिक व्यवहार करण्याआधी तिची परवानगी घ्यावी लागते. मी प्रॉपर्टी, शेअर मार्केट, सोनं – या सर्वसामान्य ठिकाणी गुंतवणूक करते."
साराची आई अमृता सिंग यांनी शॉपिंग करताना एकदा १६०० रुपयांचा फक्त टॉवेल घेतला म्हणून, ती आईला ओरडली होती. याचबरोबर, सारा २ ते ३ कप ग्रीन टी तयार करण्यासाठी फक्त एक ती बॅग वापरते. एवढंच नव्हे तर, पैशांची बचत करण्यासाठी तिने ३ वर्ष तिची आवडती कार विकत घेतली नाही. साराच्या या काटकसर करण्याच्या स्वभावाचे अनेक किस्से माध्यमात फारच लोकप्रिय आहेत.