Join us  

रुपाली गांगुली म्हणते आज मी यशस्वी अभिनेत्री असले तरी 'या' गोष्टीची कायम खंत वाटते.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 9:17 AM

Rupali Ganguli Discuss About Her Guilt: रुपाली गांगुलीच्या मनाला वाटणारी खंत नेमकी कोणती....

ठळक मुद्देमुलगा आणि नवरा यांच्यामधून मी कुठेतरी 'Left Out' होत असल्यासारखे वाटते, अशा शब्दांत तिने मातृत्व आणि करिअर यामध्ये होत असणारी तिची कुचंबना व्यक्त केली. 

छोट्या पडद्यावरची एक यशस्वी अभिनेत्री असलेली रुपाली गांगुली आज लहान पडद्यावरच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. साराभाई व्हर्सेस साराभाई या गाजलेल्या मालिकेतील तिची मॉनिशा तर रसिकांना आवडलीच होती. पण आता अनुपमाच्या माध्यमातूनही ती घराघरांत पोहोचली आहे. अनुपमाच्या शुटिंगमध्ये पुर्णवेळ बिझी असल्याने रुपालीला सध्या तिच्या कुटूंबासाठी वेळ काढणं खूपच अवघड होत आहे. त्यामुळेच तर ती म्हणते आहे की आज मी यशस्वी अभिनेत्री आहे, माझा नवराही खूप चांगला आणि मला खूप आधार देणारा आहे. एवढं सगळं चांगलं असताना एक गोष्ट मनात कायम ठसठसत राहाते (Rupali ganguli discuss her guilt). आणि ती गोष्ट म्हणजे मी माझ्या मुलासाठी वेळ देऊ शकत नाही. ( feel sad for not being there with her son)

 

रुपाली गांगुलीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिची ही खंत बोलून दाखवली. ती म्हणते की मुलगा रुद्रांशकडे लक्ष देण्यासाठी, आई म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी मला पुरेसा वेळच मिळत नाहीये. त्याला मी फक्त जन्म दिला आहे. म्हणून मी त्याची आई आहे.

घामामुळे शरीराला दुर्गंधी, केसांतून कुबट वास येतो? ३ पदार्थ खा, उष्णतेचा त्रास होणार नाही 

पण त्याची माझ्यापेक्षाही जास्त काळजी माझा नवरा घेतो. रुपालीचा नवरा अश्विन याने रुपालीचा वाढता व्याप पाहता स्वत:हून त्याच्या करिअरमध्ये ब्रेक घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या मुलासाठी तो सध्या आई आणि बाबा अशा दोन्ही भूमिका पार पाडतो आहे. याबाबत त्याची कोणतीही तक्रार कधीच नसते. उलट त्याचा आपल्याला नेहमीच खंबीर पाठिंबा असतो, असंही रुपालीने सांगितलं.

 

एकंदरीत सगळ्यात वर्किंग वुमनच्या हळव्या जखमेवर रुपालीने बोट ठेवले आहे. नोकरी, व्यवसाय याठिकाणी असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना प्रत्येक वर्किंग वुमनला या दोलायमान परिस्थितीतून जावेच लागते.

मतदान करणाऱ्यांना 'या' रेस्टॉरंटमध्ये मिळणार २० टक्के डिस्काउंट, बघा ते रेस्टॉरंट नेमकं कोणतं 

रुपाली म्हणते की खरंतर आपण यशस्वीपणे, खंबीरपणे काम करतो, यामुळे आपण एकप्रकारे आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श निर्माण करतो. ते आपल्याकडे रोलमॉडेल म्हणून पाहतात. पण तरीही असं असलं तरी वर्किंग वुमनच्या मनातली अपराधी भावना काही केल्या कमी होत नाही. मलाही तसेच वाढते.. मुलगा आणि नवरा यांच्यामधून मी कुठेतरी 'Left Out' होत असल्यासारखे वाटते, अशा शब्दांत तिने मातृत्व आणि करिअर यामध्ये होत असणारी तिची कुचंबना व्यक्त केली. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलमहिला