Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रोहित भाऊ वडापाव खाणार का?” चालू सामन्यात चाहत्याचा प्रश्न, ‘हिटमॅन’ ची मजेशीर रिॲक्शन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2025 12:05 IST

Rohit Sharma funny reaction: Rohit Sharma vada pav: Anna Hazare Trophy cricket: रोहित भाऊ वडापाव खाणार का? हा प्रश्न ऐकून चाहत्यांनी एकच कल्ला केला.

क्रिकेटच मैदान आणि रोहित शर्मा एकत्र आले तर मजेशीर किस्से नेहमीच पाहायला मिळतात. क्रिकेट मैदानावर सहसा चौकार, षट्कार, विकेट आणि स्ट्रॅटेजीचीच चर्चा कायम रंगलेली असते.(Rohit Sharma funny reaction) पण कधी कधी असे काही क्षण घडतात जे सामन्यापेक्षा जास्त सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक हलका फुलका क्षण सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. (Rohit Sharma vada pav)

ट्रकवाली शायरी नाही, अल्टो ड्रायव्हरने गाडीवर लिहिलं माझ्यापासून लांब राहा कारण अजून माझे.. व्हायरल व्हिडिओ

७ वर्षांनंतर रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफित खेळण्यासाठी पुन्हा परतला. त्यानं दीड शतक ठोकत चाहत्यांची मनं जिंकली. या चालू सामन्यादरम्यान एका चाहत्याने थेट भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला थेट प्रश्न केला. रोहित भाऊ वडापाव खाणार का? हा प्रश्न ऐकून चाहत्यांनी एकच कल्ला केला. 

रोहित शर्मा हा चाहत्यांचा लाडका हिटमॅन, मैदानावर अतिशय शांत, संयमी आणि परफेक्ट टाइमिंगसाठी ओळखला जातो. मैदानाबाहेरही तो त्याच्या साधेपणासाठी आणि विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचं मुंबईशी असलेलं नातं आणि वडापावरील प्रेम हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे चाहत्याने विचारलेला प्रश्न आणि त्यावर त्याची आलेली रिअॅक्शन अगदी फिट बसणारी होती. 

सामना सुरु असताना प्रेक्षकांच्या स्टँडमधून अचानक प्रश्न आला. रोहित भाऊ वडापाव खाणार का? सुरुवातीला या प्रश्नावर काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडल्याचं दिसलं. पण नेहमीप्रमाणे परिस्थिती सांभाळात रोहितने परिस्थिती सांभाळून घेतली. चाहत्याने प्रश्न केला "रोहित भाई, वडा पाव खाओगे क्‍या?" त्यावर रोहितने हात हलवत नाही असं म्हटलं.  रोहितच्या चेहऱ्यावरचं हसू, त्याची देहबोली आणि दिलेली मजेशीर प्रतिक्रिया पाहून आजूबाजूचे खेळाडू, अंपायर आणि प्रेक्षकही हसू आवरू शकले नाहीत. काही सेकंदांचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

यानंतर ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मीम्सचा पाऊस पडला. या व्हायरल व्हिडीओवर मजेशीर काँमेट्स देखील आले. रोहितचा हा साधेपणा आणि स्पोर्ट्समनशिपने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fan Asks Rohit Sharma About Vada Pav; Hilarious Reaction!

Web Summary : During a Vijay Hazare Trophy match, a fan asked Rohit Sharma if he would eat Vada Pav. Rohit's witty response and playful denial amused everyone. The video went viral, showcasing his down-to-earth nature.
टॅग्स :सोशल व्हायरलरोहित शर्मा