Join us

कुछ भी! नहीं तूम बोलो!- या नावाचे पदार्थ खायचे का तुम्हाला? खाण्यापेक्षा हसालच जास्त कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2024 20:06 IST

Social Viral: काहीही चालेल नावाचा पदार्थ तुम्हाला हॉटेलात खायला मिळाला तर..(restaurants offers women special menu like 'kuch bhi', 'as you wish'...)

ठळक मुद्देएका रेस्टॉरंटने चक्क खरोखरच असे पदार्थ ठेवले आहेत. त्याला नाव दिलं वूमन स्पेशल मेन्यू!

रेस्टॉरंटमध्ये जेवणं आता खूप कॉमन झालं आहे. मग ते नवरा- बायको असो, मित्र- मैत्रिणी असो किंवा मग भाऊ- बहीण असो. बऱ्याचदा असं होतं की रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर पुरुष त्यांच्यासोबत आलेल्या महिलांना कधी हौशीने तर कधी औपचारिकता म्हणून तुला काय खायचं हा प्रश्न विचारतातच. त्यात बऱ्याच जणींचं हेच उत्तर असतं की 'काही पण चालेल', 'काहीही'... तू ठरव. मग तिने असं उत्तर दिल्यावर असा पदार्थ इथे मिळत नाही, असं तिला गमतीने म्हटलंही जातं. त्यावर हशासुद्धा पिकतो. आणि अनेकदा आपल्याला काय आवडतं ते जोडीदाराला कळत नाही म्हणून अनेकजणी चिडतातही. आता मात्र एका रेस्टॉरंटने चक्क खरोखरच असे पदार्थ ठेवले आहेत. त्याला नाव दिलं वूमन स्पेशल मेन्यू!(restaurants offers women special menu like 'kuch bhi', 'as you wish'...)

 

सध्या या मेन्यूने आणि त्याच्या किमतीने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. shokeen.jatti या इन्स्टाग्राम पेजवरून एक मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

किचनच्या सिंकमधून घाणेरडा वास येतो? ३ पदार्थ वापरून करा 'हा' उपाय, दुर्गंधी गायब- सिंक चकाचक 

UMDA असं त्या रेस्टॉरंटचं नाव असून UMDA'S Women Special Menu म्हणून त्यांनी कुछ नही, कुछ भी, ॲज यु विश, नही तुम बोलो, नही नही तुम बोलो असे पदार्थ ठेवले आहेत. या पदार्थांची किंमत २०० रुपयांच्या पुढेच आहे. हा मजेशीर व्हिडिओ अतिशय व्हायरल झाला असून त्यावरून सध्या वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे.

 

काही जणींचं असं म्हणणं आहे की सगळ्याच महिला काही अशा नसतात. शिवाय ही उत्तरं महिलाच देतात असंही काही नाही. अशा पद्धतीची उत्तरं देणारे अनेक पुरुषही आहेत.

कुंडीमध्ये कोथिंबीर वाढत नाही- जळून जाते? ३ टिप्स- एवढी फुलेल की विकत घ्यावीच लागणार नाही...

त्यामुळे महिलांना नाहक स्टिरीओटाईप करण्याचे हे सगळे उद्योग आहे. अशा पद्धतीने काहींनी या पोस्टला असे गंभीर वळण देत विषय दुसऱ्याच दिशेने नेला आहे. तर काही जणांनी निव्वळ विनोद म्हणून त्याच्याकडे पाहत रेस्टॉरंटच्या कल्पकतेला मनसोक्त दाद दिली आहे. आता तुम्ही स्वत:च ही पोस्ट पाहा आणि ठरवा त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन... 

टॅग्स :सोशल व्हायरलमहिला