lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घाला बर्फाचे तुकडे, पाहा जादू.. कपड्यांवर सुरकुत्या पडणार नाहीत

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घाला बर्फाचे तुकडे, पाहा जादू.. कपड्यांवर सुरकुत्या पडणार नाहीत

Remove Wrinkles With This Ice Cube Dryer Hack : कपडे धुतल्यानंतर सुरकुत्या पडत असतील तर, बर्फाच्या तुकड्यांची मदत घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 10:59 AM2024-02-19T10:59:55+5:302024-02-19T11:00:44+5:30

Remove Wrinkles With This Ice Cube Dryer Hack : कपडे धुतल्यानंतर सुरकुत्या पडत असतील तर, बर्फाच्या तुकड्यांची मदत घ्या..

Remove Wrinkles With This Ice Cube Dryer Hack | वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घाला बर्फाचे तुकडे, पाहा जादू.. कपड्यांवर सुरकुत्या पडणार नाहीत

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घाला बर्फाचे तुकडे, पाहा जादू.. कपड्यांवर सुरकुत्या पडणार नाहीत

कपडे धुण्यापासून ते सुकवून आणि नंतर इस्त्री करून कपाटात नीटनेटके ठेवण्यापर्यंतचे काम खूप कंटाळवाणे वाटते. अनेकवेळा वीकेंडला कपडे धुण्यात, वाळवण्यात आणि इस्त्री करून ठेवण्यात बराच वेळ जातो. अशावेळी विकेंड आपला कपडे धुण्यातच जातो की काय असे वाटू लागते (Cleaning Tips). काही लोकं दररोज कपडे धुतात, तर काही लोकं आठवड्यातून एकदाच कपडे धुतात.

बऱ्याचदा कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना एकत्र गोळा होतात. ज्यामुळे कपडे चुरगळलेले तर दिसतात, शिवाय इस्त्री करण्याचा वेगळा ताप वाढतो (Washing Machine Hacks). जर वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना त्यावर सुरकुत्या पडू नये असे वाटत असेल तर, त्यात काही बर्फाचे तुकडे टाका. ऐकून आश्चर्य वाटलं ना? ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे घालण्याचे फायदे किती? पाहूयात(Remove Wrinkles With This Ice Cube Dryer Hack).

करीना म्हणाली, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सैफू! आणि सैफ काय म्हणाला? तीच ती घरोघरचीच कथा..

ड्रायरमध्ये घाला बर्फाचे तुकडे

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर काही लोकं ड्रायरमध्ये कपडे सुकवतात. ड्रायरमध्ये कपडे सुकवल्यानंतर ते फार  चुरगळलेले दिसतात. कपड्यांवर सुकुत्या पडू नये असे वाटत असेल तर, त्यात कपडे टाकण्यापूर्वी बर्फाचे काही तुकडे घाला. यामुळे कपड्यांवर सुरकुत्या पडणार नाही. शिवाय इस्त्री करण्याचीही गरज पडणार नाही.

‘देहाती मॅडम’ची इंग्रजी शिकवणी! डोक्यावर पदर घेऊन फाडफाड इंग्रजी शिकवणारी कोण ‘ती?’

हे हॅक कशापद्धतीने काम करते?

ड्रायरमध्ये कपडे टाकण्यापूर्वी त्यात बर्फाचे तुकडे घाला. यामुळे कपड्यांवर सुरकुत्या येणार नाही. खरंतर, ड्रायर चालू केल्यानंतर त्यातील टेम्प्रेचर वाढते. जर त्यात बर्फाचे तुकडे असतील तर, ते विरघळू लागतात, आणि त्याची वाफ तयार होते. वाफेमुळे कपड्यांवर सुरकुत्या येत नाही.

किती बर्फाचे तुकडे घालायचेत?

ड्रायरमध्ये कपडे टाकण्यापूर्वी त्यात बर्फाचे तीन तुकडे टाका, आणि १० मिनिटांसाठी ड्रायर चालू ठेवा. कपडे व्यवस्थित सुकतील.

Web Title: Remove Wrinkles With This Ice Cube Dryer Hack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.