Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोफा-बेडवर चहाकॉफी सांडून पडलेले डाग काढण्यासाठी एकदम सोपी ट्रिक, कळणारही नाही इथे डाग होता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 16:26 IST

remove tea stains from sofa at home : remove coffee stains from sofa naturally : remove old tea coffee stains from sofa & bed : गादी, बेड किंवा सोफ्यावर पडलेले डाग स्वच्छ करण्यासाठी घरगुती सोपे उपाय...

घरातील आरामदायक बेड किंवा सोफा म्हणजे आपली हक्काची आरामाची जागा. आपल्या घरातील सोफा किंवा बेडवर आरामात बसून चहा, कॉफी पिणे किंवा काहीतरी खाणे बऱ्याचजणांना आवडते. मऊ, मुलायम गादीवर बसून गरमागरम चहा - कॉफी पिण्याची मज्जा काही औरच असते, परंतु अनेकदा नकळतपणे (remove old tea coffee stains from sofa & bed) आपल्याकडून चहा-कॉफी सांडते, तर कधी अन्नपदार्थांचे डाग गादीवर किंवा सोफ्यावर पडतात. अशा परिस्थितीत हे डाग कसे काढावेत, हा मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण सोफा किंवा बेडची गादी आपण पाण्याने धुवू शकत नाही. इतकंच नाही तर त्यामुळे हे डाग तसेच राहिले तर दुर्गंधी आणि जंतूंचा धोका वाढतो. यासोबतच, डाग जितका जुना होईल, तितका तो काढणे कठीण जाते, यासाठी डाग पडताच तो लगेच स्वच्छ करणे गरजेचे असते(remove tea stains from sofa at home).

गादी, बेड किंवा सोफ्यावर असे डाग पडले तर लगेच स्वच्छ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत...घरातील सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने आपण हे डाग अगदी मिनिटभरात काढून गादी, बेड किंवा (remove coffee stains from sofa naturally) सोफा लगेच नव्यासारखा स्वच्छ करू शकता. यासाठी घरगुती उपाय  नेमके काय आहेत ते पाहूयात... 

सोफा, बेड किंवा गादीवरील डाग काढण्यासाठी घरगुती उपाय... 

१. बेकिंग सोडा :- चहा, कॉफी किंवा तेलकट डागावर थोडा बेकिंग सोडा भुरभुरवून घाला. त्यानंतर १० ते १५ त्या डागांवर बेकिंग सोडा तसाच राहू द्या. नंतर कोरड्या कपड्याने किंवा ब्रशने हलक्या हाताने घासून काढा. यामुळे डाग आणि दुर्गंधीही अगदी सहज निघून जाते.

२. लिक्विड डिश सोप आणि कोमट पाणी :- अन्नपदार्थांचे किंवा तेलकट डाग घालवण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. एक कप कोमट पाण्यात थोडे लिक्विड डिश वॉश मिसळा. एक पांढरा स्वच्छ कपडा या मिश्रणात भिजवून डागावर हलक्या हाताने दाबा (घासू नका, नाहीतर डाग पसरू शकतो). त्यानंतर कोरड्या कपड्याने ती जागा नीट पुसून घ्या.

३. व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण :- चहा किंवा कॉफीचे हट्टी डाग काढण्यासाठी व्हिनेगर वापरणे फायदेशीर ठरते. एका बाऊलमध्ये समप्रमाणात पाणी आणि व्हिनेगर एकत्रित मिक्स करा. हे मिश्रण थेट डागांवर स्प्रे करा आणि १० मिनिटांनी स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्या. व्हिनेगरमुळे बॅक्टेरियाही मरतात आणि डाग स्वच्छ होतात. 

४. मीठाचा वापर करा :- जर सोफा, बेड किंवा गादीवर ताजे डाग असतील तर लगेच त्यावर मीठ पसरवून घाला. मीठ त्या डागांमधील ओलावा शोषून घेते. काही वेळाने ब्रशने घासून स्वच्छ करा.

५. लिंबाचा रस :- हलके डाग आणि त्याचा वास कमी करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. लिंबाचा रस थोडा पाण्यात मिसळून डागावर कापडाने लावा. रंग हलका होतो आणि फ्रेशनेस येते.

६. कॉर्न स्टार्च तेलकट डागांसाठी :- जर तेलाचा डाग पडला असेल, तर त्यावर लगेच कॉर्न स्टार्च किंवा टॅल्कम पावडर टाका. ती पावडर तेल शोषून घेते आणि डाग गडद होत नाही.

७. हायड्रोजन पेरॉक्साइड :- जर बेडवर रक्ताचे किंवा फळांच्या रसाचे डाग पडले असतील, तर हायड्रोजन पेरॉक्साइड वापरणे फायदेशीर ठरते. डागांवर थोडे हायड्रोजन पेरॉक्साइड टाका. फेस येईल तो स्वच्छ कपड्याने पुसून काढा. ( गडद रंगाच्या सोफ्यावर वापरण्यापूर्वी कोपऱ्यात तपासून पहा, कारण यामुळे कापडाचा रंग उडू शकतो).

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Tricks to Remove Tea/Coffee Stains from Sofa-Bed

Web Summary : Spilled tea or coffee on your sofa-bed? Don't worry! Simple home remedies like baking soda, vinegar, or lemon juice can effectively remove stains. Act quickly for best results and a fresh, clean sofa.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी