Lokmat Sakhi >Social Viral > पाऊस सुरू होताच घरभर लाल-काळ्या मुंग्यांनी थैमान घातले? ४ सोप्या ट्रिक्स- मिनिटांत होतील गायब

पाऊस सुरू होताच घरभर लाल-काळ्या मुंग्यांनी थैमान घातले? ४ सोप्या ट्रिक्स- मिनिटांत होतील गायब

How to get rid of ants in rainy season: Home remedies for ants in house during rain : ant problem in rainy season: काही खास घरगुती उपाय केले तर काळ्या आणि लाल मुंग्या मिनिटांत गायब होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 13:01 IST2025-05-27T13:01:10+5:302025-05-27T13:01:48+5:30

How to get rid of ants in rainy season: Home remedies for ants in house during rain : ant problem in rainy season: काही खास घरगुती उपाय केले तर काळ्या आणि लाल मुंग्या मिनिटांत गायब होतील.

red and black ant in rainy season at home 4 simple hacks how to keep ant away from house | पाऊस सुरू होताच घरभर लाल-काळ्या मुंग्यांनी थैमान घातले? ४ सोप्या ट्रिक्स- मिनिटांत होतील गायब

पाऊस सुरू होताच घरभर लाल-काळ्या मुंग्यांनी थैमान घातले? ४ सोप्या ट्रिक्स- मिनिटांत होतील गायब

सध्या महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. पावसाळ्यात आपल्या घरात अनेक कीटक, माश्या, चिलटे आणि मुंग्या घरभर थैमान घालतात.(ant problem in rainy season) यामुळे आपल्याला वैताग येतो. इतकेच नाही तर या मुंग्या कपड्यांसह खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्ये देखील फिरतात. (rainy season pest control)
किचनच्या कट्ट्यावर, साखरेच्या डब्यात किंवा गोडाचे पदार्थ ठेवलेल्या ठिकाणी मुंग्यांची लांबलचक रांग आपल्याला पाहायला मिळते.(kitchen ant hacks) ऋतू कोणताही असला तरी झुरळे, माश्या, डास आणि लाल मुंग्या आपल्याला घराबाहेर किंवा घरात पाहायला मिळतात.(homemade ant repellent spray) जर आपल्या घरात एखादे लहान मूल असेल आणि ते रांगत असेल तर त्याला या मुंग्या चावण्याची अधिक शक्यता असते.(Easy household tricks to prevent ants in rain) ज्यामुळे त्वचा लाल होणे, पुरळ येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी आपण काही खास घरगुती उपाय केले तर काळ्या आणि लाल मुंग्या मिनिटांत गायब होतील.(Natural ways to remove ants from home)

काळीकुट्ट-घाणेरडी पायपुसणी म्हणजे घरात सतत आजारपण! ३ उपाय, कमी मेहनतीत पायपुसणी होतील स्वच्छ

1. बऱ्याचदा लाल किंवा काळ्या मुंग्या स्वयंपाकघरातील धान्य, पीठ, साखर किंवा गोडाच्या पदार्थांमध्ये जातात. त्यामुळे आपण ते पदार्थ फेकून देतो. अशावेळी आपण तांदूळ, पीठ किंवा साखरेच्या डब्यात लवंगा घालायला हवे. यामुळे मुंग्या कधीही डब्यात फिरकणार नाहीत. 

2. तांदळाच्या डब्यात बोरिक पावडर घाला आणि ती मिसळा. यामुळे लाल मुंग्यांना आत येण्यापासून रोखता येईल. यामुळे तांदूळ आणि डाळीचे रक्षण होईल. मुंग्या डाळ किंवा तांदळाला छिद्र पाडतात, ज्यामुळे आपल्याला त्याचा वापर करता येत नाही. तसेच यामुळे कीटकांपासून संरक्षण होते. 

बाथरुममध्ये चुकूनही ठेवू नका या ५ गोष्टी, साफ करताना येतात नाकीनऊ- वाढतात आरोग्याच्या तक्रारी

3. स्वयंपाकघरातील कट्ट्यावर किंवा जमिनीवर मुंग्या वारंवार दिसल्या तर त्या ठिकाणी पांढरा व्हिनेगर लावा. यामुळे मुंग्या पुन्हा येणार नाही. 

4. झाडांच्या कुंड्यांमध्ये, जमिनीवर लाल-काळ्या मुंग्यांनी वारुळ केले असेल तर यासाठी कापूरचा वापर करा. ५ ते ६ कापूरचा पावडर बनवा. यामध्ये डेटॉल घाला. यामध्ये १ ते २ कप गरम पाणी घाला. त्यात बोरिक पावडर आणि पांढरा व्हिनेगर घाला. हे द्रव चांगले मिसळा. बाटलीत भरून कुंडीजवळ, घरातील कोपरे, छिद्रे आणि फरशीवर फवारणी करा. यामुळे मुंग्या निघून जाण्यास मदत होईल. 

Web Title: red and black ant in rainy season at home 4 simple hacks how to keep ant away from house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.