Lokmat Sakhi >Social Viral > Chat Gpt ला विचारली झाडांची माहिती, पर्सनल नाजूक आली हाती! वाचा एका महिलेचा भयंकर अनुभव

Chat Gpt ला विचारली झाडांची माहिती, पर्सनल नाजूक आली हाती! वाचा एका महिलेचा भयंकर अनुभव

Read the terrible experience of a woman while using ChatGPT : जमाना जरी टेक्नॉलॉजीचा असला तरी वापरणे सुरक्षित आहे का नाही? पाहा एआय काय करु शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 12:54 IST2025-04-10T12:53:17+5:302025-04-10T12:54:42+5:30

Read the terrible experience of a woman while using ChatGPT : जमाना जरी टेक्नॉलॉजीचा असला तरी वापरणे सुरक्षित आहे का नाही? पाहा एआय काय करु शकते.

Read the terrible experience of a woman while using ChatGPT | Chat Gpt ला विचारली झाडांची माहिती, पर्सनल नाजूक आली हाती! वाचा एका महिलेचा भयंकर अनुभव

Chat Gpt ला विचारली झाडांची माहिती, पर्सनल नाजूक आली हाती! वाचा एका महिलेचा भयंकर अनुभव

गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे कमाल आविष्कार आपण पाहीले आहेत. लवकरच टेक्नॉलॉजी माणसांचीही जागा घेईल असे म्हटले जात आहे.( Read the terrible experience of a woman while using ChatGPT) सध्या फार चर्चेत असलेला विषय म्हणजे ChatGPT. चॅटजीपीटीने घिबली स्टाइल पोर्टेट करायला सुरवात केली आणि जगभरातून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ( Read the terrible experience of a woman while using ChatGPT)घिबलीमध्ये आपण आपला कोणताही फोटो टाकला की त्याचे अॅनिमेटेड वर्जन चॅटजीपीटी तयार करून देते.

सगळेच हा ट्रेंड फॉलो करत आहेत. तुम्ही ही नक्कीच केला असेल. काही अभ्यासकांनी असे फोटो टाकणे योग्य नाही असा संदेश देणारी माहिती सोशल मिडियावर टाकली होती. मग चॅटजीपीटी वापरावे की वापरु नये असा विषय  चालू असतानाच, एम.एस.पंखी या इंस्टाग्राम पेजवरुन एक पोस्ट व्हायरल झाली. ती पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला. लाईव्ह मिंट या साईटनेही त्या बातमीची दखल घेत काय प्रकार घडला ते सांगितले.

घडले असे की एम.एस.पंखीने तिच्या घरी लावलेल्या मोरपंखीच्या झाडाचे फोटो ChatGPT वर टाकले आणि पाने का सुकली आहेत तर त्याचे कारण काय? असा प्रश्न विचारला. मात्र ChatGPT चा आलेला प्रतिसाद फारच धक्कादाक होता. चिराग नावाच्या एका मुलाचा  सी.व्ही म्हणजेच बायोडेटा चॅटजीपीटीने पंखीला पाठवला. त्यामध्ये चिरागच्या शिक्षणाबद्दल, त्याच्या आयुष्याबद्दल सगळ्या वैयक्तिक माहितीची नोंद होती. या प्रकारानंतर एआय वापरणे सुरक्षित आहे का? या प्रश्नाने जोर धरला आहे.

नेकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांचे असे म्हणणे आहे, घिबलीमुळे चॅटजीपीटी आता ओव्हरलोड झाले आहे त्यामुळे अशी चूक घडली असावी. तर काही जण म्हणत आहेत, हा प्रकार फार भयानक आहे. कोणाचीही माहिती सहज कोणालाही मिळू शकते. काहींना टेक्नॉलॉजी वापरणे धोक्याचे वाटत आहे. एकीकडे एआय हेच भविष्य आहे असे म्हटले जात असताना, दुसरीकडे एआय आपली वैयक्तीक माहिती लोकांना पुरवू शकतो ही भीती आता निर्माण झाली आहे. 

फक्त चॅटजीपीटीच नाही इतरही अनेक साईट्स आहेत, ज्यावर लोक आपली वैयक्तिक माहिती साठवतात. पण जर असे प्रकार घडत असतील तर एआय टुल्सचा वापर करणे सुरक्षित आहे की नाही? असा प्रश्न पडतो. टेक्नॉलॉजी धोकादायक ठरु शकते या विषयावर आधारित अनेक वेब सिरीज तसे चित्रपट आपण पाहिले आहेत. त्या कथानकाची काल्पनिकता सत्यात उतरु शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Web Title: Read the terrible experience of a woman while using ChatGPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.