Join us

रविना टंडनसाठी लेकीनं तिचं पहिल्या कमाईतून घेतलेलं ‘हे’ गिफ्ट पाहा, रविनाआईचा आनंद पाहण्याजोगा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2024 18:29 IST

Raveena Tandon flaunts her new favorite – a faux leather bag gifted by her daughter from her first modeling gig! : लेकीच्या कष्टाच्या कमाईचं आईला कौतुक; रवीनाचा व्हिडिओ व्हायरल

मुलांच्या यशामागे त्यांची मेहनत आणि कटीबद्धता असते (Proud Parents). मुलांना यश मिळाले की सर्वात आधी आनंद त्यांच्या पालकांना होतो (Parents Love). पालकही त्यांचा गगनात न मावणारा आनंद लोकांसह शेअर करतात. काही पालक पाल्यांच्या समोर किंवा त्यांच्या गैरहजेरीत मुलाच्या मेहनतीचे गोडवे गातात.

बरेच पालक मुलांनी पहिल्या कमाईतून घेतलेल्या वस्तूही आवडीने जपून ठेवतात. त्यांच्या चेहऱ्यावर उमललेला आनंद, हा अमुल्य आणि पाहण्याजोगा असतो (Raveena Tondon). असाच आनंद अभिनेत्री रवीना टंडनच्या चेहऱ्यावर दिसून आला आहे. पापाराझींसमोर (Paparazzi) मुलीने शूटमधून घेतलेल्या कमाईतून सुंदर पर्स फ्लॉण्ट केली आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, रवीनाचा आनंद पाहून, नेटकऱ्यांनी मुलीचं कौतुक केलं आहे(Raveena Tandon flaunts her new favorite – a faux leather bag gifted by her daughter from her first modeling gig!).

जेवणानंतर 'ही' चूक केली तर पश्चाताप अटळ, वजन वाढते झरझर! ५ मिनिटं ‘एवढं’ करा...

पापाराझींसमोर रवीनाने केलं मुलीचं कौतुक

एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत काम करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते रांगेत असायचे. पण आता रवीना टडंन नाही तर तिच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे. राशा थडानी असे रवीनाच्या मुलीचे नाव असून, ती सध्या मॉडेलिंग करत आहे.

ग्लॅमरस फोटो व्हायरल

राशा हिच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूड अभिनेत्रींचा ग्लॅमर देखील फेल आहे. अभिनेत्री नसली तरी, रवीना हिची लेक म्हणून राशा प्रचंड लोकप्रिय आहे. ती सोशल मीडियात सक्रीय असून, तिचे बोल्ड - ग्लॅमरस फोटो व्हायरल होत राहतात.

आलिया भटला छळणारा ‘हा’ त्रास तुम्हालाही जाणवतो का? पाहा लक्षणं- ‘असं’ होत असेल तर..

राशाने नुकतंच आपले पहिले मॉडेलिंग फोटोशूट केले. याच फोटोशूट असाइनमेण्टमधून तिने आपल्या आईसाठी खास तपकिरी रंगाची पर्स विकत घेतली आहे. रविनाने ती पर्स पापाराझींसमोर फ्लॉण्ट केली आणि तिचं कौतुकही केलं.

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

रवीनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी राशाचं कौतुक केलं आहे. काहींना राशाच्या कामगिरीबदल कौतुक केलं, तर काहींना रवीनाचा आनंद पाहून, राशाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :रवीना टंडनसोशल व्हायरल