Lokmat Sakhi >Social Viral > पी.व्ही. सिंधूने लग्नात घातलेल्या दागिन्यांची जगभर चर्चा, त्या दागिन्यात पाहा खास काय आहे...

पी.व्ही. सिंधूने लग्नात घातलेल्या दागिन्यांची जगभर चर्चा, त्या दागिन्यात पाहा खास काय आहे...

PV Sindhu's wedding jewellery inspires fans worldwide : PV Sindhu’s Bridal Look Redefines Elegance with Kanjeevaram Silk and Stunning Jewels : PV Sindhu dons Badminton-themed custom jewels for wedding festivities with Venkata Datta Sai : सिंधूने लग्नाच्या आठवणी जपत तिच्या ज्वेलरी आणि लेहेंग्याला दिला पर्सनल टच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 15:41 IST2025-01-08T15:38:09+5:302025-01-08T15:41:23+5:30

PV Sindhu's wedding jewellery inspires fans worldwide : PV Sindhu’s Bridal Look Redefines Elegance with Kanjeevaram Silk and Stunning Jewels : PV Sindhu dons Badminton-themed custom jewels for wedding festivities with Venkata Datta Sai : सिंधूने लग्नाच्या आठवणी जपत तिच्या ज्वेलरी आणि लेहेंग्याला दिला पर्सनल टच...

PV Sindhus Wedding Jewellery Inspires Fans Worldwide PV Sindhu dons Badminton-themed custom jewels for wedding festivities with Venkata Datta Sai | पी.व्ही. सिंधूने लग्नात घातलेल्या दागिन्यांची जगभर चर्चा, त्या दागिन्यात पाहा खास काय आहे...

पी.व्ही. सिंधूने लग्नात घातलेल्या दागिन्यांची जगभर चर्चा, त्या दागिन्यात पाहा खास काय आहे...

भारताची फुलराणी म्हणून जगविख्यात असलेली बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू (PV Sindhus Wedding Jewellery Inspires Fans Worldwide) आता लग्नबंधनात अडकली आहे. २२ डिसेंबरला उदयपूर येथे पी.व्ही. सिंधू व  वेकंट दत्ता साई यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. सध्या या जोडप्याच्या लग्नाची चर्चा नेटकरी आणि सोशल मिडीयावर (PV Sindhu’s Bridal Look Redefines Elegance with Kanjeevaram Silk and Stunning Jewels) चांगलीच रंगली आहे. विवाह सोहळा राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडला. या लग्न सोहळ्यादरम्यान नववधू पी.व्ही. सिंधू अगदी सुंदर दिसत होती. एवढेच नव्हे तर लग्नादरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या विधींसाठीचे तिचे वेगवेगळे लुक्स सध्या सोशल मिडीयावर फारच व्हायरल होत आहेत, तिने आपल्या या लुकमध्ये त्यांची प्रेमकहाणी कोरली असून ऑलिम्पिक विजयाचा जल्लोषही समाविष्ट केला असल्याचे बोलले जात आहे(PV Sindhu dons Badminton-themed custom jewels for wedding festivities with Venkata Datta Sai).

लग्नासारख्या खास क्षणांसाठी घातलेले दागिने आणि कपडे हे कायमच सगळ्यांच्याच लक्षात राहतात. या खास क्षणांसाठी घातलेले कपडे आणि दागिन्यांची प्रत्येकाची अशी एक वेगळी आठवण असते. सिंधूने देखील हीच आठवण जपत तिच्या ज्वेलरी आणि लग्नाच्या लेहेंग्याला पर्सनल टच दिला होता. तिने आपले लग्नाचे दागिने आणि कपडे यात विशेष असे नेमके काय केले होते ते पाहूयात. 

पी.व्ही. सिंधूच्या दागिन्यांत असं काय खास... 

१. हाऊस ऑफ मसाबाचे डिझाईन :-पी. व्ही. सिंधूने लग्नापासूनचे तिचे अनेक लुक्स शेअर केले असून नुकताच तिचा एक नवा लुक समोर आलाय आणि त्यात तिने 'हाऊस ऑफ मसाबाचे' कपडे परिधान केले आहेत, तर वेंकटनेही तिला मॅचिंग होईल असा पोशाख घातला आहे. तिच्या या लेहेंग्याची किंमत ३.५ लाख इतकी आहे. पी. व्ही. सिंधूने कस्टम ‘अंबर बाग’ चा  सी ग्रीन रंगाचा टिश्यू लेहेंगा परिधान केला होता, तर वेंकटने कस्टम ‘अंबर बाग’ कुर्ता आणि धोती घातली होती. स्टायलिस्ट बोर्नाली काल्डेराने पी.व्ही.सिंधूच्या या कपड्यांचे डिजाईन केले होते ज्यात पी व्ही सिंधू खूपच सुंदर दिसतेय.

२. दुपट्ट्याला दिला ‘पर्सनल टच’ :- सिंधूने तिच्या लेहेंग्यासोबत चोली घालण्याऐवजी कुर्ता स्टाइलचा ब्लाऊज घातला होता. यात तिचा ट्यूब टॉप ग्रीन गोल्डन बुटी फॅब्रिकपासून तयार करण्यात आला आहे, तर फुल स्लीव्हज कुर्ता ब्लाऊज नेट फॅब्रिकचा होता. पी.व्ही.सिंधूने ट्री डिझाईन केलेल्या लेहेंग्यासोबत पेअर केले होते. यात डोरी वर्क आणि टिश्यू डिटेलिंग डिझाईन करण्यात आले होते. याचबरोबर, गोटा पट्टी वर्क आणि फॉइल सोबत तयार केलेल्या तिच्या या  कस्टम टिश्यू दुपट्ट्यात बॅडमिंटन रॅकेट, शटल कॉक, गोल्ड मेडल आणि पेपर एअर प्लेन यांसारखे डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आकर्षण ठरले आहेत, जे या जोडप्याच्या प्रेमाची कहाणी सांगतात. सिंधूसाठी हा ड्रेस खास कस्टमाइज करण्यात आला होता. 

साडी नेसायची झंझटच विसरा, ना पिनअपची गरज ना मॅचिंग परकरचं टेंन्शन, व्हा २ मिनिटांत तयार...

३. मोत्यांचे दागिने :- तिच्या लेहेंग्यासोबतच तिचे दागिनेदेखील पाहण्यासारखे होते. तिने धोरा लेबलचा हाफ मून स्टाइल मोत्याचा नेकपीस आणि मॅचिंग कानातले घातले होते, तर हातात देखील सोनेरी रंगांच्या फुलांची डिझाईन्स असलेल्या बांगड्या घातल्या होत्या. पण, त्याहूनही विशेष म्हणजे तिची मसाबाने डिझाईन केलेली अंगठी, परांदा आणि ‘नंदी’ माथा पट्टी अधिक लक्ष वेधून घेत होते. सिंधूने परिधान केलेले दागिने हे पारंपरिकता आणि आधुनिकतेचे प्रतीकच होते.  

४. लव्ह स्टोरी सांगणारे दागिने :- पी. व्ही. सिंधूची अंगठी २०१६ आणि २०२० च्या ऑलिम्पिकमधील तिच्या विजयाच्या सन्मानार्थ तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये हाऊस मॅस्कॉट – ‘द पाम’ दाखवले गेले आहे. इतकेच नाही तर शटल कॉक आणि बॅडमिंटन रॅकेट सारख्या विशेष आकर्षणांसह तिचा परांदा देखील खूप खास दिसत होता. या सर्व दागिन्यांमध्ये सिंधू आणि वेंकटची प्रेमकथा सांगणाऱ्या विमानातील चार्मही बसवण्यात आले होते.

चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...

Web Title: PV Sindhus Wedding Jewellery Inspires Fans Worldwide PV Sindhu dons Badminton-themed custom jewels for wedding festivities with Venkata Datta Sai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.