Join us
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटी रुपयांची प्रियांका चोप्राची अंगठी! काय खास त्यात? प्रियांका नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 18:09 IST

OMG ! भारतातला सर्वसामान्य माणूस जेवढे पैसे उभ्या आयुष्यात कमवू शकत नाही, तेवढ्या पैशांची अंगठी घालते प्रियांका चोप्रा. नवरा, सासर, संसार आणि दागदागिने अशा अनेक विषयांवर तिने नुकत्याच दिलखुलास गप्पा मारल्या.

ठळक मुद्देप्रियांका चोप्राची नुकतीच एक मुलाखत झाली. यादरम्यान बोलताना तिने तिच्या अंगठीची किंमत सांगितली आणि ती ऐकून सगळेच भांबावून गेले.

बडे लोग बडी बाते... असं काही उगाच म्हणत नाही बुवा. मोठ्या लोकांच्या सगळ्याच गोष्टी मोठ्या. असंच काहीसं आहे अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचं. इन्स्टाग्राम, सोशल मिडिया अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रियांका नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. प्रियांका आणि तिचा नवरा निक जोनास यांचा संसार छान सुरु आहे. त्यांच्या दोघांचे एकत्रित फोटोही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. प्रियांकाच्या बाबतीत अशीच एक खास गोष्ट जबरदस्त व्हायरल झाली आहे. विदेशात प्रियांका चोप्राची नुकतीच एक मुलाखत झाली. यादरम्यान बोलताना तिने तिच्या अंगठीची किंमत सांगितली आणि ती ऐकून सगळेच भांबावून गेले.

 

मुलाखतीदरम्यान प्रियांकाला विचारण्यात आले की तुझा सगळ्यात आवडीचा दागिना कोणता? यावर प्रियांका म्हणाली अर्थातच पती निक जोनास याने साखरपुड्यात मला घातलेली अंगठी. पुढे बोलताना खळखळून हसत ती असंही म्हणाली की, माझा सगळ्यात आवडीचा दागिना कोणता, या प्रश्नाचं उत्तर मी माझी साखरपुड्याची अंगठी असं दिलं नाही, तर नवरा निक जोनास मला मारून टाकेल. कारण ही अंगठी तब्बल दोन कोटींपेक्षाही अधिक रूपयांची आहे. यानंतर प्रियांका जोरात हसली पण तोपर्यंत तिच्या अंगठीची किंमत ऐकून अनेकांना जबरदस्त शॉक बसलेला होता. 

 

असं काय आहे या अंगठीत?अंगठीची किंमत ऐकून या अंगठीत नेमकं असं आहे तरी काय, हा प्रश्न पडणे अगदी साहजिक आहे. या अंगठीची किंमत खूप जास्त आहे कारण ही अंगठी केवळ प्लॅटिनम आणि हिरे यांचा वापर करून घडविण्यात आली आहे. प्लॅटिनम हे सोन्यापेक्षाही जास्त महाग असतं. याशिवाय या अंगठीत मोठ्या आकाराचे काही अखंड हिरे वापरण्यात आले आहे. या मोठ्या अकाराच्या एकसंध हिऱ्यांची किंमतही लाखोंच्या घरात असते. त्यामुळेच तर निकला प्रियांकासाठी ही अंगठी घ्यायला तब्बल २ कोटी रूपये मोजावे लागले. 

 

माझ्यासाठी सगळेच दागिने महत्त्वाचेस्वत:साठी सोन्याचे दागिने घेताना जशी सर्वसामान्य भारतीय महिलांची भावना असते, तशीच भावना प्रियांकाचीही आहे. ती म्हणाली की साखरपुड्याची अंगठी हा माझा सगळ्यात आवडीचा दागिना निश्चितच आहे. पण त्याचबरोबर माझे सगळेच दागिने माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येक दागिन्याच्या मागे एक वेगळी कहानी असून हे सगळेच दागिने मला अतिशय प्रिय आहेत. 

 

प्रियांका म्हणते.... पिया का घर प्यारा लगे.....एका प्रश्नाचे उत्तर देताना प्रियांका तिचे सासर, तिच्या सासरची मंडळी यांच्याबद्दल अगदी भरभरून बोलली. तिचं बोलणं ऐकून प्रियांका निकच्या संसारात, तिच्या सासरी किती रमली आहे, हेच दिसून येते. मुलाखतीदरम्यान बोलताना गप्पांच्या ओघात प्रियांका म्हणाली की माझ्या सासर- माहेरच्या घरातली मंडळी, माझे मित्रमंडळी हे जेव्हा माझ्या आसपास असतात, तेव्हा ती जागा माझ्यासाठी जणू एखादा स्वर्गच असते. प्रियांका आणि तिच्या नवऱ्याने लॉस एंजेलिस येथे नुकतंच एक अलिशान घर घेतलं असून तिने यंदाची दिवाळीही या नविन घरातच साजरी केली.

'हमको हमेशा एक दुख रहा है..' खुद्द अमिताभ बच्चन जेव्हा सांगतात, दमलेल्या बाबाची हळवी गोष्ट

 

या घराचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. आमच्या या नव्या घरात आम्ही पहिल्यांदा दिवाळी साजरी करत असून ही दिवाळी नेहमीच आमच्यासाठी स्पेशल असेल, अशी भावनिक पोस्टही तिने शेअर केली होती.. आता अंगठी दोन कोटींची तर घर किती कोटींचं असेल, हा प्रश्नही अनेकांच्या मनात नक्कीच डोकावला असणार. बघूया... कधीतरी प्रियांकाच या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकेल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलप्रियंका चोप्रानिक जोनाससेलिब्रिटी