Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > बजेटपूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींनी स्वत:च्या हातानं खाऊ घातली दहीसाखर, महत्वाच्या कामाला जाताना दहीसाखर खातात कारण..

बजेटपूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींनी स्वत:च्या हातानं खाऊ घातली दहीसाखर, महत्वाच्या कामाला जाताना दहीसाखर खातात कारण..

Benefits of Eating Curd and Sugar: दही साखर खाणं का महत्त्वाचं असतं आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात ते पाहूया..(why to eat curd and sugar?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 15:57 IST2026-02-02T14:24:50+5:302026-02-02T15:57:33+5:30

Benefits of Eating Curd and Sugar: दही साखर खाणं का महत्त्वाचं असतं आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात ते पाहूया..(why to eat curd and sugar?)

president draupati murmu gives dahi sakhar to nirmala sitaraman, benefits of eating curd and sugar, why to eat curd and sugar   | बजेटपूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींनी स्वत:च्या हातानं खाऊ घातली दहीसाखर, महत्वाच्या कामाला जाताना दहीसाखर खातात कारण..

बजेटपूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींनी स्वत:च्या हातानं खाऊ घातली दहीसाखर, महत्वाच्या कामाला जाताना दहीसाखर खातात कारण..

Highlightsया सगळ्या फायद्यांमुळेच तर राष्ट्रपतींनीही अर्थमंत्र्यांना बजेट सादर करण्यापुर्वी दही साखर खाऊ घातलं. 

काल बजेट सादर झालं. देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी ते जेवढं महत्त्वाचं असतं, तेवढंच महत्त्वाचं ते अर्थमंत्र्यांच्या दृष्टीनेही असतं. गेले कित्येक महिने त्यांनी त्यावर काम केलेलं असतं. सगळ्यांच्या अपेक्षांना खरं उतरत देशाच्या अर्थव्यवस्थेलाही पुढे नेण्याचं मोठं दडपण, ओझं त्यांच्यावर असतं. त्यामुळे त्यांच्यावर मोठा ताण असतो. अशावेळी अर्थमंत्र्यांचा म्हणजेच निर्मला सितारामन यांचा ताण कमी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना दही साखर खाऊ घातलं (why to eat curd and sugar?). ते पाहून परीक्षेला जाण्यापुर्वी दही साखर खाण्याचे दिवस अनेकांना आठवले आणि प्रश्नही पडला की दही साखर का खावी, ते खाण्याचे नेमके काय फायदे (Benefits of Eating Curd and Sugar)

 

दही साखर खाण्याचे फायदे 

१. साखरेमधून भरपूर प्रमाणात ग्लुकोज मिळतं आणि दह्यामधून प्रोटीन्स. त्यामुळे दही आणि साखर एकत्र करून खाल्ल्याने आपल्याला लगेचच ऊर्जा मिळते. 

२. जेव्हा तुम्ही परीक्षा, मुलाखत किंवा कोणत्याही मोठ्या कामामुळे तणावात असता तेव्हा दही- साखर खाल्ल्याने तुमचा मूड सुधारतो. मनावरचा ताण कमी होतो. मन आणि शरीर दोन्हीही शांत राहण्यासाठी दही- साखरेची मदत होते. 


 

३. दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनसंस्था मजबूत करतात. बऱ्याचदा आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर होतो. हा त्रास होऊ नये म्हणून तणावात असताना दहीसाखर खाणं फायद्याचं ठरतं. या सगळ्या फायद्यांमुळेच तर राष्ट्रपतींनीही अर्थमंत्र्यांना बजेट सादर करण्यापुर्वी दही साखर खाऊ घातलं. 

 

Web Title : राष्ट्रपति ने वित्त मंत्री को दही चीनी खिलाई: यह है कारण

Web Summary : राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने बजट पेश करने से पहले वित्त मंत्री निर्मला सीतारमण को तनाव कम करने के लिए दही और चीनी खिलाई। दही और चीनी तुरंत ऊर्जा देते हैं, मूड को बेहतर करते हैं, तनाव कम करते हैं और तनावपूर्ण समय में पाचन में मदद करते हैं।

Web Title : President Feeds Curd and Sugar to Finance Minister: The Reason

Web Summary : President Droupadi Murmu fed Finance Minister Nirmala Sitharaman curd and sugar before the budget presentation to ease stress. Curd and sugar provide instant energy, improve mood, reduce tension, and aid digestion during stressful times.