घरात पाल दिसली की अनेकांची भंबेरी उडते. स्वयंपाकघर असो वा हॉल, पालींचा वावर घर अस्वच्छच करण्यासोबतच भीतीहीदायक असतो. घराच्या भिंतींवर किंवा इतर ठिकाणी पाल दिसली की किसळवाणेच वाटते. घरातील पालींचा वावर आपल्याला कित्येकदा नकोसा वाटू शकतो. पालींना घरातून पळवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. काहीवेळा रासायनिक, हानिकारक स्प्रे किंवा औषधांचा वापर करतो परंतु हे सगळेच उपाय आपल्या आरोग्याला देखील त्रासदायकच ठरतात. अशा परिस्थितीत, पालींना घरातून (plants that lizards hate smell) पळवून लावण्यासाठी खास नैसर्गिक उपाय करणेच अत्यंत फायदेशीर ठरते. पालींना घरातून दूर पळवून लावण्यासाठी आता महागड्या स्प्रे किंवा औषधांची गरज नाही, फक्त बाल्कनी किंवा गार्डनमध्ये काही खास रोपं लावली तर पालींचा (plants that repel lizards naturally) कायमचा बंदोबस्त होऊ शकतो.
घराच्या बाल्कनीमध्ये काही खास औषधी आणि सुगंधी रोपे लावून नैसर्गिकरीत्या पालींना पळवून लावू शकता. यामुळे घर तर प्रसन्न दिसेलच, पण पालींचा त्रासही कायमचा संपेल. काही रोपं अशी असतात जी नॅचरल 'रिपेलेंट्स' (Repellents) आहेत, ज्यांच्या सुगंधाने पाली चुकूनही घराच्या आसपासही फिरकणार नाही. आपल्या बाल्कनीमध्ये किंवा खिडकीत लावलेली काही विशिष्ट रोपे त्यांच्या तीव्र वासामुळे पालींना घराबाहेर ठेवण्यास मदत करतात. कोणती आहेत ही रोपं आणि ती पालींना पळवण्यासाठी (natural remedies to get rid of lizard) कशी फायदेशीर ठरतात ते पाहूयात.
पालींना पळवण्यासाठी आजच लावा कुंडीत ही ६ रोपं...
१. तुळस (Tulsi) :- तुळशीचा उग्र वास पालींना अजिबात आवडत नाही. घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीजवळ तुळस लावल्यास पाली दूर राहतात.याशिवाय तुळस हवा शुद्ध ठेवते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
२. रोजमेरी (Rosemary) :- घरामध्ये रोजमेरीचे रोप लावल्याने पाली येत नाहीत. रोजमेरीचा उग्र सुगंध पालींना अजिबात आवडत नाही, ज्यामुळे त्या घरापासून दूर राहतात. हे रोप कुंडीत सहज उगवता येते, त्यामुळे तुम्ही ते तुमच्या बाल्कनीमध्ये, खिडकीत किंवा मुख्य दरवाजापाशी ठेवू शकता. या रोपाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे, यामुळे पालींसोबतच इतर कीटकही घरापासून लांब राहतात.
३. पुदिना (Mint) :- पुदिन्याचा तीव्र सुगंध पालींसाठी त्रासदायक असतो. बाल्कनी, स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ हे रोप ठेवल्यास चांगला परिणाम दिसतो.
४. लवंगाचे झाड (Clove Plant) :- लवंगांचा वास पालींना सहन होत नाही.घरात किंवा बाल्कनीमध्ये हे रोप ठेवल्यास पाली जवळपास फिरकत नाहीत.
५. लेमनग्रास (Lemongrass) :- पालींना लेमनग्रासचा सुगंध अजिबात आवडत नाही, कारण यामध्ये लिंबासारखा तीव्र वास असतो. हे रोप अतिशय वेगाने वाढते. तुम्ही हे रोप कुंडीत अगदी सहजपणे लावू शकता, याच्या तीव्र गंधामुळे पाली घराजवळ फिरकतही नाहीत.
६. लसूण रोप (Garlic Plant) :- लसणाचा वास पालींना अजिबात आवडत नाही. कुंडीत लसूण लावून बाल्कनीत ठेवल्यास पाली घरात शिरत नाहीत.
