Join us

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका चॉकलेटमुळे जगभर महागला पिस्ता, विचित्रच प्रकार घडलाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 15:22 IST

pistachios become more expensive around the world, due to a chocolate bar that went viral on social media : या एका चॉकलेटमुळे पिस्त्याची मागणी वाढली. उत्पादक राष्ट्रांची उडाली तारांबळ.

अचानक काही गोड खायची इच्छा झाल्यावर आपल्या डोक्यात चॉकलेटचाच विचार येतो.  चॉकलेटमध्ये भरपूर फ्लेवर असतात. ( pistachios become more expensive around the world, due to a chocolate bar that went viral on social media)तसेच अनेक मोठ्या ब्रॅण्डची चॉकलेट्स बाजारात उपलब्ध आहेत. चॉकलेटला कायमच बाजारात मागणी असते. मात्र एका चॉकलेटने मार्केट हलवून सोडले आहे. दुबईमधील एक मिठाई गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.( pistachios become more expensive around the world, due to a chocolate bar that went viral on social media) ती म्हणजे कुनाफा. चवीला हा पदार्थ फारच मस्त आहे. त्यामुळे तो जगभरात प्रसिद्ध झाला.

२०२१ मध्ये दुबईमधील बुटीक एमिराटी चॉकलेटियर या चॉकलेट उत्पादक कंपनीने पिस्ताशीओ चॉकलेट हे प्रॉडक्ट बाजारामध्ये आणले. त्यामध्ये कुनाफ्याचा वापर केला. टिकटॉकवर त्या चॉकलेटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. नंतर इंस्टाग्राम , फेसबुक यारख्या इतरही सोशल मिडिया साईट्सवर हे चॉकलेट व्हायरल झाले.

आजकाल सोशल मिडियावरील कंन्टेंटमध्ये अख्खे मार्केट हादरवून टाकण्याची क्षमता आहे. एखादी गोष्ट वाऱ्यासारखी पसरते. लोकांना ती आवडली तर मग बाजारातील मागणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. दुबईमध्ये सुरू झालेला हा ट्रेंड जगभरात एवढा लोकप्रिय झाला की इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी पिस्ताशीओ चॉकलेट तयार करायला सुरवात केली. जगभरातून अनेक कंपन्यांनी हे चॉकलेट लॉन्च केले.

हे चॉकलेट करताना भरपूर पिस्ता वापरला जातो. बाहेर चॉकलेटची लेअर असते. आतमध्ये कुनाफा असतो. तसेच पिस्त्याची पेस्ट भरलेली असते. सगळी मज्जा त्या पिस्त्याच्या पेस्टची आहे. लोकांना ही चव फार आवडली आहे. कुनाफा व चॉकलेटचे मिश्रण अगदी छान लागते. लोकांना ते फारच पसंतीस पडले आहे. जगभरातून या चॉकलेटमुळे पिस्त्याची मागणी वाढली. मागणी एवढी वाढली की मागणी आणि पुरवठ्याचे सगळे गणितच विस्कटले. 

अमेरीका पिस्ता उत्पादनामध्ये सगळ्यात पुढे आहे. अमेरिकेनंतर इराण, तुर्की यांचा नंबर लागतो. पिस्ता उत्पादक देशांची मागणीमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे तारांबळ उडाली आहे. तसेच पिस्त्याची किंमत वाढली. इतरही सुकामेवा उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. भारतामध्येही सध्या या दुबई कुनाफा पिस्ताशीयो चॉकलेटला भरपूर मागणी आहे.

चॉकलेट तसे फार महाग आहे तरीही मागणी कमी होत नाही, वाढतच आहे. दुबईच्या एका लहान उत्पादक कंपनीचे सुरू केलेले चॉकलेट सोशल मिडियावरील लहानशा व्हिडिओमुळे  जगभरामध्ये प्रसिद्ध झाले. पुन्हा उत्पादन सुरळीत होईपर्यंत चॉकलेटची विक्री कमी करण्याचा निर्णय अनेक कंपन्यांनी घेतला आहे.  

टॅग्स :बाजारदुबईअन्न