Lokmat Sakhi >Social Viral > 'गुलाबी रिक्षेतून प्रवास युपी व्हाया लंडन - थेट प्रिन्स चार्ल्सच्या घरात'..१८ वर्षांच्या मुलीची पाहा भरारी..

'गुलाबी रिक्षेतून प्रवास युपी व्हाया लंडन - थेट प्रिन्स चार्ल्सच्या घरात'..१८ वर्षांच्या मुलीची पाहा भरारी..

Pink E-Rickshaw Driver From UP Wins UK's Royal Award, Meets King Charles : ५ वर्षाच्या मुलीला सांभाळण्यासाठी आई चालवते ई रिक्षा- लंडनच्या प्रिन्सकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2024 06:03 PM2024-05-25T18:03:01+5:302024-05-26T10:18:00+5:30

Pink E-Rickshaw Driver From UP Wins UK's Royal Award, Meets King Charles : ५ वर्षाच्या मुलीला सांभाळण्यासाठी आई चालवते ई रिक्षा- लंडनच्या प्रिन्सकडून कौतुक

Pink E-Rickshaw Driver From UP Wins UK's Royal Award, Meets King Charles | 'गुलाबी रिक्षेतून प्रवास युपी व्हाया लंडन - थेट प्रिन्स चार्ल्सच्या घरात'..१८ वर्षांच्या मुलीची पाहा भरारी..

'गुलाबी रिक्षेतून प्रवास युपी व्हाया लंडन - थेट प्रिन्स चार्ल्सच्या घरात'..१८ वर्षांच्या मुलीची पाहा भरारी..

'अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती' हा डायलॉग आपण ऐकलं असेल (Social Viral). स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो (Royal Award). दृढनिश्चय असला तर, अनेक लोक अडथळ्यांवर मात करत आपलं ध्येय गाठतात. असाच एक सुखकर आणि ध्येय गाठण्याचा प्रवास आरती या १८ वर्षीय मुलीने पूर्ण केला आहे.

तिच्या रिक्षेचा प्रवास हा लंडनपर्यंत पोहचला असून, तिचा थेट सन्मान राजा चार्ल्स III यांच्याकडून झाला आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा होत असून, तिचं कौतुकही होत आहे. आरती नेमकी आहे तरी कोण? तिचं राजा चार्ल्सकडून कौतुकाची थाप का मिळाली?(Pink E-Rickshaw Driver From UP Wins UK's Royal Award, Meets King Charles).

पाम तेल तब्येतीसाठी वाईट म्हणून वापरणं टाळता? ICMR म्हणते पाम तेल फायदेशीर; पण..

राजा चार्ल्सकडून कौतुकाची थाप - १८ वर्षीय आरती ती कोण?

पर्यावरणाबद्दल आता लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे. त्यामुळे लोक पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्या सोडून इलेक्ट्रोनिक वाहनांचा वापर करीत आहे, आणि भारतातल्या उत्तर प्रदेशमधील एका लहानशा गावातील आरती, हिने ई रिक्षा चालवून लोकांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे.

तिने पर्यावरणपूरक मार्ग निवडला असून, तिच्या या कामगिरीची दखल लंडनच्या राजा चार्ल्स III यांनी घेतली आहे. तिला लंडनमधील प्रतिष्ठित अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्कार मिळाला असून, प्रिन्स ट्रस्ट अवॉर्ड्समधून आरतीचा सन्मान करण्यात आला आहे.

ई रिक्षाबद्दल बोलताना तिने सांगितले की, 'मी माझी गुलाबी रिक्षा, पेट्रोल किंवा डिझेलवर चालवत नाही. यामुळे प्रदूषण होते. मी ई रिक्षा चालवते. दिवसभर चालवून मी, दररोज रात्री घरी चार्ज करते.'

'आश्चर्यकारक अनुभव'

२२ मे रोजी पुरस्कार सोहळ्यानंतर आरतीला बकिंघम पॅलेसमध्ये राजा चार्ल्सला भेटण्याची संधी मिळाली. तिने या भेटीचे वर्णन 'आश्चर्यकारक अनुभव' असे केले. शिवाय ती पुढे म्हणाली, 'राजांना भेटण्याचा अनुभव खूप छान होता. त्यांनी माझ्या घरच्यांचीही विचारपूस केली. शिवाय घरच्यांना त्यांच्याकडून नमस्कार सांगितला.'

बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल

शेवटी आपल्या कार्याबद्दल आरती म्हणाली, 'मला ५ वर्षांची मुलगी आहे. मी आयुष्यात बऱ्याच आव्हानांना सामोरे गेले आहे. म्हणून अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या महिलांची मदत करायची आहे, शिवाय प्रेरणा द्यायची आहे.'

Web Title: Pink E-Rickshaw Driver From UP Wins UK's Royal Award, Meets King Charles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.