आपल्या घराची गॅलरी, खिडक्या, बाल्कनीत कबुतरांचा वावर असतोच. सहाजिकच, कबूतर फार मोठ्या प्रमाणात असले म्हणजेच त्यांची शीट (विष्टा) देखील सर्वत्र पसरलेली असते. कबुतरांची विष्टा (How To Clean Pigeon Droppings) फक्त दिसायलाच घाणेरडी वाटते असं नाही, तर तिचा वास आणि त्यातून निर्माण होणारे जीवाणू आरोग्यासाठी देखील हानिकारक असतात. आपल्या घराच्या आसपासच्या भागात कबुतरांच्या विष्ठेची अशी घाण पसरलेली पाहून नकोसे वाटते(Tips and Tricks to Clean Pigeon Poop on Your Balcony or Terrace).
कबुतरांची विष्ठा साफ करणं ही एक त्रासदायक आणि किळसवाणी गोष्ट वाटते. परंतु कबुतरांची विष्ठा साफ करणं तितकंच आवश्यक असते, कारण हा प्रकार अत्यंत अस्वच्छ आणि बऱ्याचवेळा (Pigeon Poop Cleaning 3 Tricks From Balcony & Terrace Floor) घृणा आणणारा असतो. कबुतरांची विष्ठा वेळच्यावेळी स्वच्छ केली नाही तर ती सुकून त्याचे डाग फरशीवर पडतात आणि दुर्गंधी येऊ लागते. यासाठीच, घराच्या आसपासच्या भागात कबुतरांच्या विष्ठेची घाण फारशी मेहेनत न घेता स्वच्छ करण्याचे सोपे घरगुती उपाय पाहूयात. या सोप्या आणि कमी खर्चिक उपायांमुळे कबुतरांच्या विष्ठेची घाण फरशीवरुन अगदी सहजपणे काढता येऊ शकते. यासाठी नेमक काय करायच ते पाहूयात.
कबुतरांच्या विष्ठेची घाण स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स...
१. कडुलिंबाची पाने व मीठ :- फरशीवरील कबुतरांची विष्ठा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाची पान, मीठ आणि पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. यासाठी सर्वप्रथम १० ते १५ कडुलिंबाची पान घ्या आणि ती ५ ते ७ मिनिटं पाण्यात उकळा. पानं नीट उकळल्यानंतर त्या पाण्यात २ चमचे मीठ घालून चांगलं मिक्स करा. यानंतर या कडुलिंबाच्या पानांत थोडं नॉर्मल पाणी मिसळा आणि तयार झालेले द्रावण विष्ठा असलेल्या फरशीवर ओता. ५ मिनिटांसाठी तसेच राहू द्या. नंतर ब्रशच्या मदतीने त्या ठिकाणाची सफाई करा. उपायाने विष्ठा निघून जातेच, पण त्या ठिकाणीचे जंतू नष्ट होण्यासही मदत होते.
कमोड-वॉश बेसिनवरचे पिवळे डाग झटपट गायब करणारा चहा पावडरचा उपाय, बाथरुम चकाचक...
२. बर्फ, अँटीसेप्टिक लिक्विड आणि व्हिनेगर :- जर फरशीवरील कबुतरांची विष्ठा सुकली असेल आणि सहज निघत नसेल, तर आपण बर्फ, अँटीसेप्टिक लिक्विड आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. सर्वप्रथम ३ ते ४ बर्फाचे तुकडे विष्ठा असलेल्या ठिकाणी ठेवा आणि काही वेळ तसंच राहू द्या. इतकं झाल्यावर एका वाटीत ३ ते ४ टेबलस्पून अँटीसेप्टिक लिक्विड घ्या आणि त्यात तेवढ्याच प्रमाणात व्हिनेगर मिसळा. नंतर त्यामध्ये एक वाटी पाणी घालून चांगलं मिक्स करा. हे द्रावण स्प्रे बॉटलमध्ये भरून विष्ठा असलेल्या भागावर फवारणी करा आणि १० मिनिटं तसेच सोडून द्या. शेवटी एखाद्या कपड्याच्या तुकड्याने, स्पंजने किंवा स्क्रबरच्या मदतीने त्या भागाची नीट सफाई करा.
बाथरुमच्या पाईपमध्ये केसांचा गुंता अडकून चोकअप होते? ३ ट्रिक्स, पाणी तुंबणार नाही...
३. रॉकेल आणि पाणी :- फरशीवरील कबुतरांच्या विष्ठेची स्वच्छता करण्यासाठी आणि त्यांना गॅलरी किंवा टेरेसपासून दूर ठेवण्यासाठी रॉकेल फायदेशीर ठरु शकते. यासाठी सर्वप्रथम विष्ठा असलेल्या ठिकाणी रॉकेल आणि पाण्याचे मिश्रण ओता. नंतर वायपरच्या मदतीने त्या जागेची नीट सफाई करा. सफाईनंतर हवे असल्यास रॉकेलने ओल्या केलेल्या फडक्याने फरशी पुसू शकता. यामुळे कबुतर त्या ठिकाणी येणं टाळतात, कारण त्यांना असा उग्र वास आवडत नाही. रॉकेलमधून येणाऱ्या तीव्र वासामुळे कबूतर गॅलरी किंवा टेरेसकडे पुन्हा फिरकणार देखील नाहीत. हा उपाय केल्याने सुकलेली विष्ठा सहज निघते आणि त्या जागेवर दुर्गंधीही राहत नाही.