महिलांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे, पाळी आणि पाळीच्या दिवसांत होणारा त्रास. काहींचे पोट दुखते तर काहींची पाठ.(period cramps are the drama of urban women!) काहींचे पाय दुखतात तर काहींचे डोके. दर महिन्यात हे सहन करायचे असतेच. पाळीच्या काळात होणार्या मुड स्वींग्स बद्दलच्या टिपण्ण्या आपण ऐकतोच, की महिलांचे पिरिएड मुड स्विंग्स खोटे असतात.(period cramps are the drama of urban women!) मानसिक असतात. पण आता एका महिलेनी पाळीत येणार्या कळासुद्धा मानसिक असल्याचा दावा केला आहे.
गोविंदाची मुलगी टीना आहूजा म्हणते," चंदिगड पंजाब सारख्या ठिकाणी गावाकडे राहणार्या महिलांना मेनोपॉज झालेला कळत सुद्धा नाही. पण मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या मुलींना पिरिएड क्रॉम्पस वगैरे होतात. शहरात राहणार्या मुलींचेच हे चोचले आहेत. या मुली तूप खात नाहीत, अति डायटिंग करतात.(period cramps are the drama of urban women!) इंस्टाग्रामवर नेगेटिव्ह बघून मुलींना क्रॉम्पस येतात". एकीकडे योग्य आहार घ्या. डायटिंग करा. असे सगळे तज्ज्ञ सांगत असताना टिना सांगते डायटिंग मुळे पोट दुखत. ती म्हणते, "तिला पाळीचा त्रास होत नाही आणि तो मानसिक आहे."
एकीकडे तज्ज्ञ सांगतात, "पाळीच्या दिवसात होणारा त्रास हृदय विकाराच्या झटक्या एवढा वाईट असू शकतो. काही महिलांना होणारा त्रास भयंकर आहे." दुसरीकडे हा त्रास मानसिक असल्याचे टिना दावा करत आहे. आजूबाजूच्या मुलींच दुखणं ऐकून त्रास होत नसलेल्या मुलींना त्रास होतो असं तीचं म्हणणं आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात, "प्रत्येक महिलेच्या शरीराची रचना वेगळी असते. काहींना रक्तस्त्राव जास्त होतो. काहींना कमी. काहींच्या पाळीचा कालावधी ४-५ दिवस असतो, तर एकीकडे ८-९ दिवस रक्तस्त्राव होणार्या मुली देखील आहेत. काहींना पाळीच्या दिवसात असह्य त्रास होतो. काहींना होत नाही." यात सुदृढ असण्याचा संबंध नाही. शरीर रचनेवर ते अवलंबून असते. योग्य आहार आणि काळजी घेणे गरजेचे असते. पण पाळीच्या दिवसात होणारा त्रास मानसिक असू शकतो का?
टीना आहूजा या वक्तव्यानंतर सोशल मिडियावर महिला वर्गाकडून ती प्रचंड ट्रोल झाली आहे. "तुला त्रास होत नाही म्हणजे आमचा खोटा ठरतो का?" असे प्रश्न मुली तिला विचारत आहेत. गावाकडे राहणार्या मुलींनी शहरातील मुलींची साथ देत, "गावाकडच्या मुलींना त्रास होत नाही, हे विधान चुकीचे असल्याचे सांगितले. टीना विरूद्ध उगाच खोटे आरोप केल्याच्या कमेंट्स भरपूर आहेत.