Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मूल झालं मला जरा तरी..!' किती जाड झाली म्हणून नावं ठेवणाऱ्या ट्रॉलर्सना राजकुमार रावच्या बायकोने घडवली अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2026 15:11 IST

Patralekha Slams Body Shaming Comment: अभिनेत्री तसेच प्रोड्युसर पत्रलेखा तिच्या वाढलेल्या वजनामुळे सध्या खूप जास्त ट्रोल होत आहे...(Patralekha's straight answer to trollers)

ठळक मुद्देसेलिब्रिटींनाही वय, आजार, त्रास आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त सेलिब्रिटी म्हणून न बघता आधी एक व्यक्ती म्हणून पाहाणं खूप गरजेचं आहे.

बाळंतपण हा एका कोणत्याही महिलेच्या आयुष्यात होणारा खूप मोठा बदल असतो. तिच्यावर जबाबदारीचं ओझं असतं, बाळाच्या संगोपनाची काळजी असते, स्वत:च्या करिअरचेही प्रश्न असतात आणि त्यातच शारिरीकदृष्ट्याही तिच्यात खूप बदल झालेले असतात. सर्वसामान्य महिलांच्या बाबतीत होणारे हे बदल आपण सहज स्विकारतो. पण जेव्हा प्रश्न सेलिब्रिटी महिलांचा येतो, तेव्हा त्यांना लगेच ट्रोल केलं जातं. बाळंतपण असो की इतर काही असो, त्यांनी नेहमीच फिट, स्लिम असायला हवं अशी अपेक्षा असते. अन्यथा त्यांच्या बाबतीत लगेच बॉडी शेमिंग होत आहे (Patralekha Slams Body Shaming Comment). हेच सध्या अभिनेता राजकुमार राव याची पत्नी तसेच अभिनेत्री, निर्माती पत्रलेखा अनुभवते आहे.(Patralekha's straight answer to trollers) 

 

नोव्हेंबर २०२५ मध्ये पत्रलेखा आणि राजकुमार राव यांना मुलगी झाली. त्यानंतर पत्रलेखा काही दिवसांपुर्वी पहिल्यांदाच मीडियासमोर आली. यावेळी ती खूप हेल्दी वाटत होती. बाळंपणानंतर तिचं वजन बरंच वाढलेलं दिसलं. यामुळे तिला खूप जास्त ट्रोलिंग सहन करावं लागलं.

लिंबाच्या रोपाशेजारी चुकूनही लावू नका 'ही' रोपं, ना लिंबाचं रोप वाढेल ना लिंबू येतील...

तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यावर लोकांनी तिला तोंडाला येईल त्या कमेंट दिल्या. त्यानंतर मात्र तिचा संयम सुटला आणि तिने ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं. ती म्हणाली की मी काही महिन्यांपुर्वीच मुलीला जन्म दिला आहे. बाळंतपणामुळे शरीरात झालेला हा बदल पुर्णपणे नैसर्गिक आहे. असं नाहीये की मी एका जागी नुसतं बसून डोंगराएवढं खात होते. 

 

या दरम्यान मी २ चित्रपटांची निर्मितीही केली. मुलींचा जन्म आणि त्यानंतर चित्रपट निर्मिती हे काही सोपे काम नाही. आणि जर मला शक्य असतं तर मी अशी झालेही नसते.

कितीही पौष्टिक असले तरी 'हे' पदार्थ रात्री खाऊ नयेत, वजन- शुगर वाढून तब्येत बिघडते

पण माझं शरीर बाळांतपणानंतर झालेल्या बदलांना याच पद्धतीने रिॲक्ट करत आहे. त्यामुळे बोलण्यापुर्वी प्लीज थोडा तरी विचार करा... असं रोखठोक उत्तर तिने ट्रोलर्सला दिलं आहे. सेलिब्रिटींनाही वय, आजार, त्रास आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त सेलिब्रिटी म्हणून न बघता आधी एक व्यक्ती म्हणून पाहाणं खूप गरजेचं आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Patralekha slams body shaming trolls after postpartum weight gain.

Web Summary : Actress Patralekha faced body shaming after her recent childbirth. She responded strongly to trolls, emphasizing the natural changes post-pregnancy and her simultaneous work on film productions, urging consideration before commenting.
टॅग्स :सोशल व्हायरलराजकुमार रावपत्रलेखा