सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. दिवसेंदिवस वातावरणात खूपच गारठा वाढत चालला आहे. जसजसे वातावरणातील गारठा वाढतो किंवा थंडीचा पारा घसरतो तशी हुडहुडी भरवणारी (Open The Jacket Chain Do This Simple Solution Protect Yourself From Wind While Riding a Bike During Winter Season) थंडी वाजते. थंडी पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण शाल, स्वेटर, मफलर यांसारख्या गरम - उबदार कपड्यांचा वापर करतो. शक्यतो थंडीच्या (How to protect yourself in cold weather when riding a motorcycle or bike) दिवसांत प्रवास करणे म्हणजे नकोसे वाटते. गाडी किंवा बसमधून प्रवास करताना आपल्याला खूप थंडी वाजते. थंडीच्या दिवसांत शक्यतो आपण प्रवास करणे टाळतोच. एवढंच नव्हे तर बाईक किंवा स्कुटी सारख्या टू - व्हिलरवरुन असल्या थंडीत प्रवास करणे तर आणखीनच कठीण होते(How to winter-proof yourself during winter season).
बस किंवा फोर व्हिलर गाडी मधून प्रवास करताना आपण थंडी लागली तर किमान खिडकीच्या काचा बंद तरी करु शकतो. परंतु टू - व्हिलरवरुन प्रवास करताना अशी कोणतीच सोय नसते. यामुळे आपण शक्यतो थंडीच्या दिवसांत टू - व्हिलरवरुन प्रवास करणे टाळतोच किंवा अंगात जाडजूड स्वेटर, जॅकेट घालून मगच प्रवास करतो. परंतु कितीही स्वेटर, शाल, मफलर गुंडाळून घेतले तरीही टू - व्हिलरवरुन प्रवास करताना आपल्याला थंडी लागतेच. अशा परिस्थितीत, टू - व्हिलरवरुन प्रवास करताना आपल्याला थंडी लागू नये म्हणून आपण दोन गोष्टींचा वापर करणार आहोत. नेमक्या या दोन वस्तू कोणत्या आहेत ते पाहूयात.
हिवाळ्यात टू - व्हिलरवरून जाताना थंडी लागू नये म्हणून ट्रिक...
१. वर्तमानपत्र :- थंडीच्या दिवसांत टू - व्हिलरवरुन प्रवास करताना आपण थंडी लागू नये म्हणून वर्तमानपत्राचा वापर करु शकतो. टू - व्हिलरवरुन प्रवास करताना आपण शक्यतो थंडीपासून बचाव करण्यासाठी जॅकेट, स्वेटर यांसारख्या गरम - उबदार कपड्यांचा वापर करतो. परंतु या उबदार जॅकेट्सना चैन असते, आणि ही चैन बंद केलेली असली तरीही या चैनमधून थोडीफार हवा आत जाऊन थंडी वाजतेच. अशावेळी आपण जॅकेट घालूंन त्याची चैन अर्धवट बंद करून मग त्यात तीन ते चार घड्या घातलेल एक जाडजूड वर्तमानपत्र ठेवावं. वर्तमानपत्र बरोबर चैनीच्या वर आलं पाहिजे असं ठेवून घ्यावे. त्यानंतर जॅकेटची चैन बंद करून घ्यावी. यामुळे जॅकेटच्या चैनमधून फारशी हवा आत येणार नाही. यामुळे आपल्याला टू - व्हिलरवरुन जाताना जास्त थंडी लागणार नाही. अशाप्रकारे आपण वर्तमानपत्राचा वापर करु शकतो.
चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...
२. एअर बबल पॉलिथीन :- वर्तमानपत्रासोबतच आपण एअर बबल पॉलिथीनचा देखील वापर करु शकतो. वर्तमानपत्रा प्रमाणेच आपण जॅकेट घालताना एक मोठी एअर बबल पॉलिथीनची शीट घेऊन, त्या शीटच्या तीन ते चार घड्या घालून आपल्या जॅकेटच्या चैनच्या मागच्या बाजूला ठेवू शकतो. त्यानंतर जॅकेटची चैन बंद करावी. एअर बबल पॉलिथीनचा एक जाडजूड थर आपल्या छातीजवळच्या भागात असल्याने आपल्याला फारशी थंडी लागणार नाही. जे लोक थंडीच्या दिवसांत भल्या पहाटे ऑफिस किंवा कॉलेजला जातात आशानी हा उपाय फॉलो करणे अधिक फायदेशीर ठरेल. यामुळे कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण केले जाईल. वर्तमानपत्रापेक्षा एअर बबल पॉलिथीनचा थर हा अधिक जाड असल्याने आपल्याला फारशी थंडी लागणार नाही.
टेबलफॅनची जाळी न काढता- हातही न लावता ५ मिनिटांत 'असा' करा स्वच्छ, फॅन दिसेल नव्यासारखा...
मध -साखर नको, फक्त वाटीभर लिंबाचा रस वापरुन घरच्याघरी वॅक्सिंग करण्याची नवी पद्धत...
इतरही गोष्टी ठेवा लक्षात...
१. बाईक, स्कुटी सारख्या टू - व्हिलरवरून प्रवास करणार असाल तर कायम गरम - उबदार कपडे सोबत ठेवा.
२. कानाला हवा लागून थंडी वाजू नये म्हणून हेल्मेट घालावे.
३. गरम - उबदार कपड्यांसोबतच हातात हातमोजे किंवा ग्लव्हज घालावेत.
अशाप्रकारे थंडीच्या दिवसांत भल्या पहाटे टू - व्हिलरवरुन प्रवास करणार असाल तर या दोन गोष्टी आपल्यासोबत कायम ठेवा. यामुळे कडाक्याच्या थंडी पासून आपले संरक्षण केले जाईल.