Join us

Home Hacks: जुनी आवडती जीन्स आता होत नाही? घट्ट जीन्स परफेक्ट फिट होण्यासाठी एक सोपा उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 18:21 IST

Social Viral: तब्येत सुधारल्यामुळे सध्या मापाला येत नाही, अशी एखादी जुनी जीन्स (old jeans) कपाटात असेलच ना.. काढा ती जीन्स बाहेर आणि करून बघा हा सोपा उपाय...(home hacks)

ठळक मुद्देहा उपाय करण्यासाठी आपल्याला काही पैसे खर्च करण्याची गरज नाही. शिवाय उपाय करून पाहिल्याने खूप काही नुकसान होईल, असंही मुळीच नाही.

काही काही कपड्यांमध्ये आपला भारी जीव असतो. ते जुने झाले, आता मापाला येईनासे झाले तरी मुळीच टाकून द्यावेसे वाटत नाहीत. त्यामुळे मग आपण ते कपाटातल्या एका कोपऱ्यात किंवा माळ्यावरच्या सुटकेसमध्ये दडवून ठेवताेच.. जुने झालेले पण अजूनही क्वालिटी चांगले असलेले कपडे अजूनही एखाद्या दिवशी कधीतरी आपल्याला येतीलच ही सुप्त आशा आपल्या मनात असतेच.. एखाद्या सध्या लहान झालेल्या जीन्सबद्दलही तुम्हाला अशीच आशा वाटत असेल तर झटकन हा उपाय वाचा आणि लगेचच प्रॅक्टिकल करून बघा.. काय सांगावं खरोखरंच लहान झालेली जीन्स आता परफेक्ट (perfect fit jeans) येऊ लागेल..

 

सध्या हा एक उपाय सोशल मिडियावर (social viral) जबरदस्त व्हायरल झाला आहे. द मिरर यांनी दिलेल्या वृत्तानुसार लिली स्कोक्नेच या परदेशातील एका महिलेने हा उपाय करून पाहिला आणि त्यानंतर तिला जीन्स ज्या पद्धतीने फिट बसली ते पाहून ती खूपच आश्चर्यचकीत झाली. तिच्या आजीने तिला हा उपाय सुचवला होता, असं तिने सांगितलं आहे...

 

एखादी जीन्स जर आता येत नसेल, लहान होत असेल तर ती जीन्स जशी येते तशी घाला. त्यानंतर जीन्स घालूनच आंघोळ करा. ओली जीन्स तशीच दिवसभर अंगात राहू द्या आणि भरपूर चाला. जीन्स जेव्हा वाळेल तेव्हाच ती अंगातून काढा आणि सरळ दोरीवर टाकून आणखी सुकू द्या. यासाठी वॉशिंग मशिन किंवा ड्रायरचा वापर करू नका. हा उपाय केल्यानंतर पुन्हा दुसऱ्यावेळी जेव्हा तुम्ही जीन्स घालाल, तेव्हा ती जीन्स तुम्हाला परफेक्ट फिट बसली आहे हे जाणवेल आणि हिच ती लहान होणारी जीन्स होती का, असा प्रश्नही पडेल, असंही सांगितलं आहे..

 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही पैसे खर्च करण्याची गरज नाही. शिवाय उपाय करून पाहिल्याने खूप काही नुकसान होईल, असंही मुळीच नाही. त्यामुळे जर उपाय आवडला तर नक्कीच करून बघा. जीन्स परफेक्ट फिट झाली तर उत्तमच, पण नाही झाली तरी त्यात आपले काही नुकसान नाहीच.. त्यामुळे उपाय करून बघायला हरकत नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशनहोम रेमेडीब्यूटी टिप्स