आईच्या मायेची उब खरंतर कुणीच भरुन काढू शकत नाही. पण कधी कधी देवदूतासारखे काही जण आपल्याला भेटतात जे आईच्या मायेची जाणीव दुसऱ्या रुपाने करुन देतात.(nurse bravery) अशीच एक घटना घडली ती हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात.(nurse viral video) सध्या सोशल मीडियावर एका महिला नर्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.(Himachal Pradesh flood news) हिमाचल प्रदेशातील मंडी या जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला.(nurse vaccination river) रस्त्यांसह नदी- नाले तुंडूब भरलेले पाहायला मिळाले पण आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत या नर्सने अवघ्या २ महिन्याच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. (Mandi viral news)
हा व्हिडीओ आहे मंडी जिल्ह्यातील चौहरघाटी येथील सुधार पंचायत गढ नाल्या जवळचा. त्या परिसरात ड्यूटीवर असणाऱ्या स्टाफ नर्स कमलाने उडी मारुन वाहणाऱ्या नाल्यातून प्रवास केला. मिळालेल्या माहितीनुसार टिक्कर गावातील रहिवासी असलेल्या स्टाफ नर्स कमला यांना सांगितले की, त्यांना ड्युटीसाठी सुधार पंचायचीच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात जावे लागेल. पण गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरु होता. यामुळे रस्ते तर जलमय झाले होते पण पुलांची दूरव्यवस्था देखील झाली होती. त्यामुळे ड्यूटीवर जाणं देखील कठीण झालं होते. दररोज सुमारे चार किलोमीटर अंतर पार करुन जावे लागत असे. पण जीवाची परवा न करता तिने ओसंडून वाहणाऱ्या स्वाड नाल्यावरुन उडी मारली आणि त्यानंतर दोन महिन्यांच्या मुलाला इंजेक्शन देऊन त्याचा जीव वाचवला. यानंतर ती पुन्हा ड्यूटीसाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचली.
मिळालेल्या माहितीनुसार ही नर्स शुक्रवारी सकाळी कठोग पंचायतच्या हुरंग नारायण देवता गावात आपल्या लसीकरणाच्या ड्यूटीसाठी सुधार स्वास्थ केंद्रातील जात होती. पण २० ऑगस्टला मंडीमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने रौद्र रुप धारण केले होते. नदी-नाले तुंडूब पाण्याने भरून वाहत होते. नर्सने आपला जीव धोक्यात घालून नदी पार केली आणि गावात लसीकरणासाठी पोहोचली. तिच्या कामाप्रती प्रेम पाहून अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.