Join us

उंदीर, झुरळांनाही खाऊ घाला बिस्कीट! करा असा भन्नाट घरगुती उपाय की घर सोडून जातील पळून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2025 16:50 IST

New easy trick to get rid of rats or cockroch from house : how to get rid of mice & cockroch without poison : फक्त एक बिस्किट आणि स्वयंपाकघरातील काही इतर साहित्याच्या मदतीने घरातील उंदीर - झुरळांना लावा पळवून...

घरातील झुरळं आणि उंदरांचा वावर फारच त्रासदायक वाटतो. घराच्या कानाकोपऱ्यात फिरणाऱ्या झुरळं आणि उंदरांना पाहिले की, अगदी नकोसेच वाटते. घरातील उंदीर आणि झुरळं फक्त घाणच (New easy trick to get rid of rats or cockroch from house) करीत नाहीत तर अन्नपदार्थ, कपडे आणि अगदी घरातील वस्तूंचेही नुकसान करतात. याशिवाय, उंदीर आणि झुरळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. घराच्या कानाकोपऱ्यात लपून बसलेले उंदीर व झुरळं (how to get rid of mice & cockroch without poison) अनेकदा घरात इतका उच्छाद मांडतात की आपली पळता भुई थोडी होतेच. या झुरळं आणि उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो(fastest way to get rid of rats & cockroch in house naturally).

बाजारात मिळणारे केमिकल स्प्रे किंवा पेस्ट कंट्रोलचे उपाय काही काळापुरतेच परिणाम देतात आणि त्यात रसायनांचं प्रमाण जास्त असल्याने लहान मुलं किंवा घरातील पाळीव प्राण्यांसाठी ते धोकादायक ठरू शकते. घरातील उंदीर आणि झुरळांना पळवून लावण्यासाठी खास घरगुती उपाय इंस्टाग्राम वरील shiprarai2000 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. खरंतर, शिप्रा राय यांनी उंदरांना घरातून बाहेर काढण्याचा एक नवीन जुगाड सांगितला आहे, जो कदाचित तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल. यासाठी तुम्हाला फक्त एक बिस्किट आणि स्वयंपाकघरातील काही इतर साहित्याची गरज लागणार आहे. 

घरातील उंदीर व झुरळांना पळवून लावण्यासाठी साधासोपा उपाय...  

शिप्रा राय यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन, उंदीर व झुरळांना पळवून लावण्यासाठी जो उपाय सांगितला आहे तो करण्यासाठी ४ ते ५ बिस्किटे (खारट किंवा गोड कोणतेही चालेल), बेकिंग सोडा १ टेबलस्पून, व्हिनेगर १ टेबलस्पून, २ ते ३ टेबलस्पून मोहरीचे तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

बाहेरुन तांब्याचे कोटिंग असलेली भांडी झाली काळीकुट्ट? न घासताच करा मिनिटभरात स्वच्छ - साधासोपा घरगुती उपाय...

उपाय नेमका आहे तरी काय ? 

सगळ्यात आधी एक बिस्किट घ्या आणि त्यावर साधारण अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला. बिस्किटाच्या गोलाकार आकारावर बेकिंग सोडा व्यवस्थित पसरवा. यानंतर त्यावर व्हिनेगरचे काही थेंब टाका, ज्यामुळे हलका फेस तयार होईल. सर्वात शेवटी थोडेसे मोहरीचे तेल टाकून ते ही पसरवा. मोहरीच्या तेलाचा सुगंध उंदरांना बिस्किटांकडे आकर्षित करेल आणि त्यातील इतर सामग्री जसे की, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर आपले काम करेल. बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण हे उंदरांसाठी नैसर्गिकरित्या त्रासदायक ठरते आणि त्यांना घर सोडून जाण्यास भाग पाडते.  

१५ दिवसांत झरझर वाढेल विड्याच्या पानांचा वेल, पानांचा आकारही मोठा; कुंडीत मिसळा २ रुपयांचा खास पदार्थ...

मुलांच्या स्टडी टेबलवर चुकूनही ठेवू नयेत ६ गोष्टी! अभ्यासातून लक्ष होईल विचलित - मुलं अभ्यासाचा करतील कंटाळा... 

आता हे तयार केलेले बिस्किट घरातील त्या कोपऱ्यांमध्ये, फटींमध्ये, किचनच्या खालच्या भागांत किंवा जिथे उंदीर - झुरळांचे प्रमाण सर्वात जास्त असते. बिस्किट अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे लहान मुले किंवा पाळीव प्राणी थेट पोहोचू शकणार नाहीत. जरी या उपायात कोणतेही विष वापरलेले नसले तरी, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

उंदीर मारण्याऐवजी पळवून लावण्याचा उपाय... 

हा उपाय उंदरांना मारण्याऐवजी त्यांना दूर पळवण्यासाठी फायदेशीर आहे, त्यामुळे उंदीर मेल्यावर येणाऱ्या घाणेरड्या वासाची समस्या उद्भवणार नाही. जेव्हा उंदीर हे बिस्किट खातो, तेव्हा बेकिंग सोडा त्याच्या पोटात जातो. बेकिंग सोडा पोटातील आम्लासोबत (Acid) मिळून गॅस तयार करतो. यामुळे उंदराला अस्वस्थता जाणवते आणि तो बेचैन होऊन घरातून बाहेरच्या दिशेने पळून जातो. या उपायात व्हिनेगर आणि मोहरीचे तेल उंदरांना बिस्किटाकडे आकर्षित करण्याचे काम करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Bait rats, cockroaches with biscuits! A simple home remedy to banish them.

Web Summary : Tired of rats and cockroaches? A simple homemade solution using biscuits, baking soda, vinegar, and mustard oil can help drive them away. The mixture creates discomfort, forcing them to leave your home without using harmful chemicals.
टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी