अचानक पोटात दुखू लागले की आपण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे दुर्लक्ष करतो. पोटदुखी, गॅस होणे, अपचन यांसारख्या समस्यांना आपल्याला कायमच सामोरे जावे लागते. परंतु, दिल्लीमधील एका महिलेच्या पोट फुगण्याचे आणि दुखण्याचे कारण वेगळेच सांगण्यात आले आहे.(New delhi case)
दिल्लीतील ३८ वर्षीय महिलेने परदेशात झालेल्या सिझेरियन प्रसूतीनंतर तिला ४ वर्ष दुखणं सहन करावं लागलं. (emergency C‑section) तिच्या शस्त्रक्रियेनंतरची परिस्थिती ही अधिक गंभीर आणि अनपेक्षित होती. लाईव्ह सायन्सच्या वृत्तपत्रानुसार तिची प्रसुती सी-सेक्शन पद्धतीने करण्यात आली.(large abdominal cyst) त्यानंतर तिला पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला वेदना जाणवू लागल्या. अहवालानुसार त्यावेळी डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रियेनंतर होणारी ही वेदना सामान्य असते असं म्हटलं. परंतु कालांतराने त्या ठिकाणी एक गाठ तयार झाली आणि वेदना अधिक तीव्र होत गेल्या. (surgical sponge left behind)
पावसाळ्यात कांदे-बटाटे लवकर सडतात-हिरवे कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे-बटाटे टिकतील महिनाभर
२०१४ मध्ये चार वर्षांनंतर त्या महिलेने दिल्लीत पुढील वैद्यकीय सल्ला घेतला. डॉक्टरांनी तिच्या पोटाचे अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन केले. पोटाच्या ज्या भागात तिला वेदना होत होत्या त्या ठिकाणी एक सिस्ट आढळून आला. डॉक्टरांना सुरुवातीला असे वाटले की तो मेसेंटेरिक सिस्ट आहे. जो लहान ट्यूमर असून जो आपल्या शरीरात अस्वस्थता आणि वेदना निर्माण करु शकतो. पण इतक्यावर डॉक्टरांनी समाधान न मानता एमआरआय स्कॅनही केलं. स्कॅनिंगचे रिपोर्ट पाहून डॉक्टर गोंधळात पडले. स्कॅनमध्ये सिस्टमच्या आत जाड पडद्यासारखे काहीतरी डॉक्टरांना दिसले. यामुळे पोटात टेपवर्म संसर्गाची शक्यता अधिक वाढली.रुग्णांला त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशन दरम्यान त्यांना आढळले की ते लहान आतड्याच्या भागाला चिकटलेला स्पंज होता जो त्यांना कापून काढावा लागला. महिला बरी झाली असून तिला आठवड्याभरानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
लोकांनी मारले टोमणे-चिडवलं -नावं ठेवली; न खचता उभं राहण्याची हिंमत मात्र कमावलीच..
डॉक्टर म्हणतात की पोटात सापडलेल्या सिस्टची लांबी सुमारे २० सेंटीमीटर इतकी होती. पण ऑपरेशन दरम्यान समजले की हा स्पंज आहे. सी- सेक्शनच्या काळात हा चुकून राहिला असावा. हा स्पंज ऑपरेशन दरम्यान वापरला जातो. पण तो सहजपणे विरघळू शकला नाही. ज्यामुळे रुग्णाच्या पोटात सिस्ट तयार झाला. या परिस्थितीला गॉसिपिबोमा असं म्हटलं जातं. अहवालानुसार अशा घटना दर १००० ते १५०० शस्त्रक्रियांपैकी एकदाच घडतात. ऑपरेशन दरम्यान रक्त शोषण्यासाठी स्पंज आवश्यक असतात, परंतु एकदा ते लाल झाले की, ते मांसात मिसळू शकतात आणि जखम बंद करण्याची वेळ आल्यावर ते सहज दुर्लक्षित होऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे.