Join us  

नवरात्रोत्सव: पूजेच्या चांदी, तांबे, पितळेच्या वस्तू घासून पुसून कशा कराल लख्ख?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2021 3:31 PM

नवरात्र सुरू होतंय म्हंटल्यावर सगळ्यात आधी घरोघरी केली जाते ती साफसफाई. देवघरातल्या मुर्ती आणि पुजेसाठी वापरण्यात येणारी चांदी, तांबे, पितळेच्या वस्तू कशा लख्ख करायच्या याच्या काही सोप्या पद्धती.

ठळक मुद्देदेव अजून छान चमकावेत यासाठी हा सिक्रेट उपाय करून बघा.

नवरात्र बसणार असल्यावर घरोघरी महिलांची वेगवेगळ्या गोष्टींची तयारी सुरू होते. यापैकी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे देवघर, देवघरातल्या मुर्ती आणि पूजेच्या वस्तूंची साफसफाई. यापैकी देवघर तर आपण घासून पुसून स्वच्छ करतो. पण देवघरातल्या मुर्ती आणि पितळ, तांबे आणि चांदीच्या पुजेच्या वस्तू स्वच्छ कशा करायच्या हे लक्षात येत नाही. म्हणूनच मग घरातले उत्तम पदार्थ आपण बाजूला ठेवतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि विकत मिळणारे लिक्विड वापरून देव स्वच्छ करतो. या विकतच्या साहित्याने देव तेवढ्यापुरते स्वच्छ होतात, पण त्यामुळे मुर्तीची झीज सुरू होते आणि त्या मुर्तींवरचे आकार किंवा बारीक कलाकुसर एकेक करून पुसली जाते. म्हणूनच देवघरातील मुर्तींची आणि पुजेच्या साहित्याची स्वच्छता करण्यासाठी कधीही बाजारात विकत मिळणारे कोणतेही लिक्वीड वापरू नका. त्याऐवजी या घरगुती पदार्थांचा उपयोग करा.

photo credit- google

पितळेच्या मुर्ती स्वच्छ करण्याची पद्धत१. मीठ, दही आणि हळदया उपायाने पितळेच्या मुर्तींची अगदी छान साफसफाई करता येते. यासाठी सगळ्यात आधी देवाच्या पितळेच्या मुर्ती कोमट पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर मुर्ती कोरड्या करून घ्या. आता दह्यामध्ये मीठ टाका आणि हा लेप मुर्तींवर ५ मिनिटे लावून ठेवा. जेवढे दही घेतले असेल, तेवढेच मीठ घ्यावे. त्यानंतर एकेक मुर्ती चोळून- चोळून स्वच्छ करा. नवा टूथब्रश वापरून देखील तुम्ही देवाच्या मुर्ती स्वच्छ करू शकता. किंवा टूथब्रशचा पर्याय वापरायचा नसेल तर मग हाताने चोळून देखील मुर्तींची स्वच्छता करता येते. यानंतर मुर्ती कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

- अशा पद्धतीने मुर्ती स्वच्छ केल्यानंतर तिला नवी चकाकी आलेली असेलच पण तरीही आपले देव अजून छान चमकावेत यासाठी हा सिक्रेट उपाय करून बघा. वरील उपाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही मुर्ती धुवून घ्याल, त्यानंतर मुर्ती थोडी ओलसर असतानाच त्याच्यावर हळद चोळून लावा. हळदीचा लेप मुर्तींवर ५ मिनिटांसाठी राहू द्या. त्यानंतर या मुर्ती पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्या. हळदीचा लेप लावल्याने मुर्ती अधिकच पिवळसर होतात आणि छान चमकू लागतात. देवघरात लाईट असेल तर त्याच्या उजेडाखाली अशा पद्धतीने स्वच्छ केलेल्या मुर्तींचे तेज अधिकच जाणवू लागते. 

 

२. चिंचेचा कोळ, लिंबू आणि मीठतांब्याची, पितळाची पुजेची भांडी किंवा देवाच्या मुर्ती १० ते १५ मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर त्या मुर्तींवर चिंचेचा कोळ आणि मीठ हे मिश्रण एकत्र करून लावा. एखादा मिनिट हे मिश्रण मुर्तींवर तसेच राहू द्या. त्यानंतर प्रत्येक मुर्ती चोळून चोळून स्वच्छ करा. चिंचेचा कोळ नसल्यास तुम्ही लिंबू देखील यासाठी वापरू शकता. लिंबू किंवा चिंच, मीठ लावून मुर्ती, पितळाची भांडी स्वच्छ केल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. यानंतर व्हिम साबणाने या मुर्तींची पुन्हा एकदा स्वच्छता करा. व्हिम साबण लावल्यामुळे या मुर्तींची चमक पुढील अनेक दिवस चांगली राहते. मुर्ती लवकर खराब होत नाहीत. 

photo credit- google

चांदीची भांडी कशी स्वच्छ करायची१. चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी कोलगेट पावडरचा वापर करावा. या पावडरने घासल्यास चांदीची भांडी किंवा देवाच्या मुर्ती लगेचच स्वच्छ होतात. अनेक जण पांढरी रांगोळी आणि मीठ यांच्या एकत्रित मिश्रणानेही चांदीची भांडी आणि देव घासतात.२. व्हिम लिक्वीडनेही चांदीची भांडी अतिशय स्वच्छ निघतात. फक्त व्हिमने घासण्याआधी काही काळ भांडी गरम पाण्यात पाण्यात भिजवून ठेवा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलनवरात्रीपूजा