Join us

Navaratri 2025 : घटाभोवती हिरवेगार दाट गहू, मोहरी उगवण्यासाठी ८ टिप्स, सुंदर दिसतील रोपं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 15:18 IST

Navratri Ghatasthapana : Navratri 2025 : How to do Ghatasthapana at home : Navratri Ghatasthapana wheat mustard growing tips : how grain should be sown during navratri importance of sown barley in shardiya navratri : नवरात्रीत घटातून उगवणारी हिरवीगार रोपं अधिक दाट आणि हिरवीगार होण्यासाठी खास घरगुती टिप्स...

नवरात्रीच्या सणाला आता अवघे काहीच दिवस बाकी राहिले आहेत. नवरात्रीचा सण आपण अगदी आनंदात व उत्साहात साजरा करतो. नवरात्रीत घटस्थापनेला (Navratri 2025) विशेष असे महत्त्व असते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घट बसवणे ही एक महत्त्वाची परंपरा असते. घरोघरी सुंदर असे घट बसवले जातात. घटात आपण माती पसरवून त्यात वेगवेगळ्या प्रकारची(Navratri Ghatasthapana) धान्य घालतो. परंतु काहीवेळा घटाभोवती उगवणारी रोप उगवताना ती पिवळसर होऊ नये किंवा भरगच्च येण्यासाठी खास काळजी घेणं महत्त्वाचं आहे( how grain should be sown during navratri importance of sown barley in shardiya navratri).

नवरात्रीत घटस्थापना केल्यावर, घटाभोवती उगवणारी रोप दाट आणि हिरवीगार यावीत अशी आपली इच्छा असते. काहीवेळा योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास घटातील रोप व्यवस्थित उगवून येत नाहीत. यासाठीच, काही सोप्या उपायांनी आपण घटातील उगवून येणाऱ्या रोपांना दाट व सुंदर करु शकतो. घटातील रोप दाट आणि हिरवेगार उगवण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात... 

घटाभोवती उगवणारी रोप दाट आणि हिरवेगार उगवण्यासाठी काही खास टिप्स... 

१. घटस्थापना करण्यासाठी शेतातील काळ्या मातीचाच वापर करावा. घटात काळी माती घालताना ही माती चाळून घेऊ नये. 

२. घटात पेरली जाणारी धान्य ही आकाराने मोठी, कडक आणि टपोरी असावीत, जेणेकरून रोप व्यवस्थित उगवून येऊ शकेल. आतून पोकळ असणाऱ्या धान्यांचा चुकूनही वापर करु नये अन्यथा रोप उगवून येत नाहीत. 

ना माती, ना कुंडी, ग्लासभर पाण्यात लावा आलं घरच्याघरीच! ताजं औषधी आलं चहात घाला मस्त...

३. पेरणीसाठी वापरली जाणारी धान्ये मातीत रुजवण्याआधी, किमान २ ते ३ तास किंवा संपूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावीत. पाण्यांत भिजवल्यानंतरच ही धान्ये पेरणीसाठी वापरावीत. 

४. धान्य मातीत पेरताना, सगळी धान्ये थेट मातीत मिक्स करु नका. धान्ये मातीच्या थरावर पसरवून घाला. 

नवरात्री स्पेशल : पूर्वतयारी न करता, १५ मिनिटांत करा उपवासाचा ढोकळा! पांढराशुभ्र, चव अप्रतिम - करायला सोपी रेसिपी... 

Navratri 2025 : ९ दिवस रोज काढा देवीच्या पाऊलांच्या सुंदर- रेखीव रांगोळ्या, पाहा प्रत्येक दिवसासाठी खास डिझाईन्स.. 

५. घट बसवल्यानंतर त्यावर पाण्याचा हलका स्प्रे करा. पाणी जास्त देऊ नका, कारण जास्त पाणी दिल्याने बियाणे कुजू शकतात. घट कोरडे होऊ नयेत यासाठी दररोज थोडे थोडे पाणी शिंपडा.

६. घटांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. दिवसातून कमीतकमी ५ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. यामुळे घट लवकर आणि हिरवेगार उगवतात. 

७. घट बसवण्यासाठी मातीच्या किंवा पितळेच्या भांड्याचा वापर करणे योग्य ठरते. भांड्याला खाली छिद्र नसावे, जेणेकरून पाणी साचून राहील.

८. सुरुवातीला घटावर ओलसर कापड झाकल्याने बिया लवकर उगवतात.

टॅग्स :सोशल व्हायरलनवरात्रीपाणीइनडोअर प्लाण्ट्स