Lokmat Sakhi >Social Viral > डेंग्यू-मलेरिया पसरवणारे डास घरभर उडतात? लावा ‘हा’ जादूई दिवा, डास परत घरात दिसणार नाहीत...

डेंग्यू-मलेरिया पसरवणारे डास घरभर उडतात? लावा ‘हा’ जादूई दिवा, डास परत घरात दिसणार नाहीत...

Natural Tips To Get Rid Of Mosquitoes Or Machar & Keep Away From House : Natural mosquito repellent : best natural ways to control mosquitoes : Homemade repellent : natural tips to get rid of mosquitoes : home remedies to repel mosquitoes : chemical free mosquito solutions : डासांना पळवून लावण्यासाठी करा सोपा आणि नैसर्गिक असा खास घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 15:51 IST2025-09-09T14:43:37+5:302025-09-09T15:51:34+5:30

Natural Tips To Get Rid Of Mosquitoes Or Machar & Keep Away From House : Natural mosquito repellent : best natural ways to control mosquitoes : Homemade repellent : natural tips to get rid of mosquitoes : home remedies to repel mosquitoes : chemical free mosquito solutions : डासांना पळवून लावण्यासाठी करा सोपा आणि नैसर्गिक असा खास घरगुती उपाय...

Natural Tips To Get Rid Of Mosquitoes Or Machar & Keep Away From House natural tips to get rid of mosquitoes home remedies to repel mosquitoes chemical free mosquito solutions | डेंग्यू-मलेरिया पसरवणारे डास घरभर उडतात? लावा ‘हा’ जादूई दिवा, डास परत घरात दिसणार नाहीत...

डेंग्यू-मलेरिया पसरवणारे डास घरभर उडतात? लावा ‘हा’ जादूई दिवा, डास परत घरात दिसणार नाहीत...

डास, माशा चावणे म्हणजे अगदी नकोसेच वाटते. आपल्या घराच्या आसपास अशा घोंगावणाऱ्या डास, माशा असले की आपल्याला थोडी भीतीच वाटते. पावसाळ्यात अशा डास, मच्छर यांमुळे डेंग्यू आणि मलेरिया यांसारखे धोकादायक आजार होण्याची शक्यता अधिक जास्त वाढते. यापासून वाचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे डासांना (Natural Tips To Get Rid Of Mosquitoes Or Machar & Keep Away From House) घरापासून दूर ठेवणे. बाजारात डासांना (best natural ways to control mosquitoes) पळवून लावणारे अनेक प्रॉडक्ट्स मिळतात, पण त्यांपैकी बरेचसे प्रॉडक्ट्स हे केमिकल्सयुक्त असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. डासांना पळवून लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या (chemical free mosquito solutions) प्रकारच्या मॉस्किटो कॉईल, स्प्रे, गोळ्या, औषधांचा वापर करतो. परंतु या सगळ्या हानिकारक आणि केमिकल्सयुक्त उपयांपेक्षा नैसर्गिक उपाय करणे कधीही उत्तमच(natural tips to get rid of mosquitoes).

डेंग्यू आणि मलेरिया यांसारखे धोकादायक आजार पसरवणाऱ्या डासांना घरांतून पळवून लावण्यासाठी घरगुती, नैसर्गिक उपाय पाहूयात. घरातीलच काही नेहमीच्या वापरातील पदार्थांच्या मदतीने आपण हा देसी उपाय घरच्याघरीच एकदम कमी खर्चात सहज पद्धतीने करु शकतो. प्रसिद्ध शेफ जसप्रीत सिंग यांनी डासांना पळवण्यासाठी असा एक सोपा उपाय सांगितला आहे, जो सुरक्षित तर आहेच, शिवाय करायलाही खूप सोपा आहे. हा उपाय डेंग्यू आणि मलेरियाचे डास तुमच्या घरापासून दूर ठेवण्यास मदत करेल.

डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय... 

डेंग्यू आणि मलेरिया यांसारखे धोकादायक आजार पसरवण्याऱ्या डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी एक खास घरगुती उपाय, chefjaspreet.singh या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटा काचेचा एअर टाईट कंटेनर, १ टेबलस्पून चहा पावडर, १ ते २ दालचिनीच्या काड्या, कपभर पाणी, आणि ३ ते ४ टेबलस्पून तेल १ मोठी व जाड कापसाची वात इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

उपाय नेमका काय आहे ?

हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी एका काचेच्या एअर टाईट कंटेनरच्या झाकणाला बरोबर मधोमध एक मध्यम आकाराचे छिद्र तयार करून घ्यावे. या झाकणावर केलेल्या छिद्रामध्ये कापसाची मोठी व जाड वात घालावी. ही वात नेहेमीच्या वातीपेक्षा थोडी जाड व लांब असावी. तयार वात कंटेनरमधील मिश्रणात  व्यवस्थित भिजेल याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर, या कंटेनरमध्ये चहा पावडर, दालचिनीचा छोटा तुकडा, पाणी व थोडेसे तेल ओतून घ्यावे. मग ही कापसाची वात पेटवून घ्यावी. हा तयार दिवा, घरातील ज्या भागात खूप जास्त मच्छर किंवा डास असतील त्या भागात ठेवून द्यावा. 

हा घरगुती उपाय डासांना पळवून लावण्यासाठी कसा फायदेशीर... 

ही दिव्याची जळणारी वात हळूहळू मिश्रणातील तेल शोषून घेईल आणि मंद आचेवर जळत राहील. जळताना चहा पावडर आणि दालचिनीचा सुगंध हवेत पसरेल, जो डासांना अजिबात सहन होत नाही. जेव्हा हा सुगंध संपूर्ण खोलीत पसरेल, तेव्हा डास आत येणार नाहीत. हा उपाय खासकरून रात्रीच्या वेळीकरणे फायदेशीर ठरते, कारण त्यावेळी डास जास्त प्रमाणात घरात येत असतात. 

दालचिनीचा तीव्र आणि तिखट वास, तसेच चहा पावडरचा अनोखा सुगंध एकत्र येऊन असे वातावरण तयार करतात, जे डासांना अजिबात आवडत नाही. डास सहसा खाण्याचा शोध घेण्यासाठी सतत वास घेत असतात. यामुळे या दिव्यातून येणारा तीव्र वास त्यांच्या या वास घेण्याच्या क्षमतेत अडथळा आणतात, ज्यामुळे ते त्या भागापासून दूर राहतात. कंटेनरमधील तेलाचा थर एक आणखी संरक्षक कवच म्हणून काम करतो. वात हळूहळू जळत असल्यामुळे, मिश्रणातील सामग्रीचा वास सतत हवेत पसरत राहतो. यासाठीच, घरातील हानिकारक डासांना पळवून लावण्यासाठी हा खास घरगुती व नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतो.


Web Title: Natural Tips To Get Rid Of Mosquitoes Or Machar & Keep Away From House natural tips to get rid of mosquitoes home remedies to repel mosquitoes chemical free mosquito solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.