Join us

घरातील उंदीर जातील पळून! कांदा, चमचाभर बेसन आणि माचिसच्या काड्यांचा देसी उपाय - उंदीर दिसणारच नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 17:37 IST

natural homemade rat repellent : how to get rid of mice at home : home remedies to keep mice away : homemade solutions for rat problem: स्वयंपाकघरातील कांदा, बेसन आणि इतर काही पदार्थांच्या मदतीने उंदरांना झटपट कसे पळवून लावता येईल ते पाहा..

घरात जर उंदीर असतील तर त्यांच्यामुळे होणारा त्रास अगदी नकोसा वाटतो. घरात एकदा का उंदीर शिरले की, स्वयंपाकघरातील सामान, कपडे आणि घरातील इतर वस्तूंचे (natural homemade rat repellent) मोठे नुकसान करतात. उंदीर फक्त घरात घाणच करत नाहीत, तर ते अनेक आजारांचे (how to get rid of mice at home) देखील मुख्य कारण ठरु शकतात. घरात राहून सतत त्रास देणाऱ्या या उंदरांना घराबाहेर पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. घरात सतत हैदोस घालणारे उंदीर कधी एकदा घराच्या बाहेर जातात असे आपल्याला होते(homemade solutions for rat problem).

घरातील उंदरांना घराबाहेर पळवून लावण्यासाठी आपण बाजारातून अनेक स्प्रे,औषध, गोळ्या, पिंजरे, ग्लू स्ट्रीप असं सगळं विकत आणतो. असे अनेक उपाय करूनही ते काहीवेळा फेलच ठरतात. याचबरोबर, उंदरांना पळवून लावण्यासाठी बाजारातून आणलेले रासायनिक प्रॉडक्ट्स आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. बाजारातील केमिकल्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक आणि सुरक्षित घरगुती उपाय अधिक चांगले ठरतात. आपण घरातीलच काही पदार्थांचा वापर करून, उंदरांना कायमचे पळवून लावू शकतो. स्वयंपाकघरातील कांदा, बेसन आणि इतर काही पदार्थांच्या मदतीने उंदरांना झटपट कसे घराबाहेर पळवून लावता येईल ते पाहूयात. 

उंदरांना पळवून लावण्यासाठी हा घरगुती उपाय आहे असरदार... 

घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी खास घरगुती उपाय करताना , आपल्याला १ कांदा, १५ ते २० माचिसच्या काड्या, १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, १ टेबलस्पून बेसन, १ टेबलस्पून बेकिंग सोडा, १ टेबलस्पून पिठीसाखर आणि अर्ध्या लिंबाचा रस तसेच थोडेसे पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

उपाय नेमका आहे तरी काय ? 

एक मध्यम आकाराचा कांदा घ्या आणि त्याला मधोमध कापा. त्याचे स्लाइस करुन एका प्लेटमध्ये ठेवा. एका बाऊलमध्ये, माचिसच्या काड्यांचे फक्त पुढचे  काळे टोक व्यवस्थित वाटून त्याची पूड करून घ्या. त्यात लाल तिखट, बेसन आणि बेकिंग सोडा मिसळा. आता त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा आणि थोडे पाणी घालून एक पातळसर बॅटर तयार करा. तयार केलेले मिश्रण प्रत्येक कांद्याच्या तुकड्यावर चमचाभर पसरवा. बॅटरचे प्रमाण जास्त नसावे, याची काळजी घ्या. कांद्यावर पसरवून घातलेल्या मिश्रणावर वरून थोडीशी पिठीसाखर भुरभुरवून घाला. पिठीसाखरेच्या सुगंधामुळे उंदीर लवकर आकर्षित होतील. आता हे कांद्याचे तुकडे एका पेपरवर ठेवून घराच्या कानाकोपऱ्यात किंवा जिथे उंदरांचा वावर असेल त्या भागात ठेवून द्या. 

इडली - डोशाचं पीठ जास्त आंबलं,फेकून देण्याआधी वाचा ८ फायदे!  घराच्या स्वच्छतेसाठीही उपयोगी...

 नागवेलींच्या पानांचा वेल वाढत नाही, पाने गळतात? ५ टिप्स - हिरवागार वेल वाढेल जोमाने... 

हा उपाय कसा आहे असरदार ? 

कांद्याचा वास आणि माचिसच्या काळ्या भागाचा तीव्र गंध उंदरांना आवडत नाही त्यामुळे उंदीर त्यापासून लांब पळून जातात. तर, बेसन आणि पिठीसाखरेचा सुगंध त्यांना आकर्षित करतो, पण जेव्हा ते हे मिश्रण खातात, तेव्हा ते त्यांच्यासाठी हानिकारक ठरते. लिंबू आणि मिरची पावडरचा तिखटपणा देखील उंदरांना हानिकारक ठरतो.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी