Join us  

फॅमिली इर्मर्जन्सीचं कारण सांगून ‘ती’ आयपीएल मॅचला गेली, बॉसला टीव्हीवर दिसली आणि.. मोये-मोये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2024 3:30 PM

Moye Moye Moment: Bengaluru Woman's 'Family Emergency' During RCB's IPL Match Was Caught By Her Boss On Live Tv : बॉसला थाप मारुन मॅच पहायला गेली, पण लाइव्ह दिसल्याने घोळ झाला आणि..

भारतात आयपीएल म्हणजे जणू सोहळा. आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी चाहते वेळ काढून, सामना पाहतात. मॅच पाहण्यासाठी काही लोक स्टेडियमवर जातात, तर काही मोबाईल अथवा टीव्हीवर पाहतात. चौकार, षठकार, आपला आवडता संघ अन् कल्ला.. असे एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळते. पण स्टेडियमवर सामना पाहण्याची गोष्टच निराळी आहे. परंतु प्रत्येक वेळी, सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर जायला मिळेलच असे नाही. काही लोक आपल्या आवडत्या टीमची मॅच पाहण्यासाठी विशेष सुट्टी टाकतात, तर काही लोक बॉसला खोटं कारण देऊन, स्टेडियमवर हजेरी लावतात.

आता लाखोंच्या संख्येमध्ये आपण दिसणार कसे? या हेतूने काही लोक सामना पाहायला स्टेडियमवर जातात. एका मुलीने असेच केले. ती बॉससोबत खोटं बोलून, मॅच पाहायला गेली तर खरी, पण लाईव्ह टिव्हीनं तिचं भांड फोडलं(Moye Moye Moment: Bengaluru Woman's 'Family Emergency' During RCB's IPL Match Was Caught By Her Boss On Live Tv).

लडकी की चोरी पकडी गयी..

आरसीबीची महिला फॅन बंगळुरूस्थित नेहा द्विवेदी हिच्यासोबतचा घडलेला प्रसंग, सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. नेहाने तिच्या बॉसला फॅमिली इर्मजन्सीचं खोटं कारण देत सुट्टी घेतली, आणि सुट्टी घेऊन थेट मॅच पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली. पण नेहाचं पितळ उघडं पडलं. तिच्या बॉसने तिला टीव्हीवर पाहिलं, आणि तिचा खोटारडेपणा समोर आला.

चांदीचे दागिने-पैंजण काळे पडलेत? एक भन्नाट ट्रिक-१५ मिनिटात चमकतील दागिने आणि भांडी

नेहाने यासंदर्भात, इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करून शेअर केला, व व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मोये-मोये दिवसेंदिवस खरं समोर येत आहे.' याबाबत नेहा म्हणते की, बॉसने टीव्हीवर पाहिले आणि मेसेज करून चौकशी केली. बॉस कूल होता, त्यामुळे खोटं बोलूनही काही त्रास झाला नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी कमेण्ट करून खिल्ली उडवली आहे.

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

गुढीपाडवा विशेष: अवघ्या ५ मिनिटात काढा गुढीची सुरेख रांगोळी; एक पळी घ्या अन् भोवतीने आकर्षक रंग भरा

नेहा द्विवेदीनं पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी कमेण्ट करून ट्रोल केलं. एका युझरने 'तुला ऑफिसमधून काढून टाकायला हवं. कारण ऑफिसमध्ये खोटे बोललात आणि नंतर खासगी कार्यालयातील संभाषण शेअर केलं.' तर दुसऱ्याने 'मॅनेजर सुद्धा कामात बसून, मॅच पाहत आहे'. तर आणखी एका नेटकऱ्याने 'तुझ्यासोबत घडलेला प्रकार पाहून, गोलमाल चित्रपटाची आठवण झाली.'

टॅग्स :आयपीएल २०२४सोशल व्हायरलसोशल मीडियाबेंगळूर