Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या भावात विकला जातो 'हा' आंबा, वाचा का आहे किंमत जास्त-आहे काय त्यात एवढं खास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2026 18:15 IST

Most Expensive Mango of The World: जगातला सगळ्यात महाग आंबा कोणता आणि त्यांची किंमत किती रुपये आहे बरं?

उन्हाळा म्हणजे आंब्याचा मौसम... उन्हाळ्यात आंबा नाही खायचा तर मग काय खायचं असा प्रश्न खऱ्या आंबाप्रेमींना पडतोच.. आंबे खाण्याची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून करावी, असं म्हणत असले तरी आंबाप्रेमींना एवढी वाट बघणं शक्यच नसतं. त्यामुळे मग बाजारात या दिवसांत अतिशय महाग मिळणारा हापूस आंबा खरेदी केला जातोच आणि आंबट असला तरी आनंदानं तो खाल्ला जातो. कारण तो महाग असतो ना.. आता बाजारात १ हजार रुपये डझन या भावाने मिळणारा हापूस आपल्याला खूप महाग वाटत असेल तर जगातल्या सगळ्यात महाग आंब्याची किंमत ऐकून तर सर्वसामान्यांवर डोळे पांढरे होण्याचीच वेळ येते. कारण या आंब्यासाठी तब्बल १ तोळा सोन्यापेक्षाही जास्त किंमत मोजावी लागते. तो आंबा  नेमका कोणता ते पाहा...(Most Expensive Mango of The World)

 

जगातल्या सगळ्यात महागडा आंबा कोणता?

आपला हापुस जगभरात विविध देशात निर्यात होत असला तरी जगभरातला सगळ्यात महाग आंबा म्हणजेच 'मियाजाकी' आंबा हा आपल्याकडे पिकत नाही. जपानमध्ये या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. या मियाजाकी आंब्यालाच 'एग ऑफ दि सन' असं म्हणूनही विकलं जातं.

फक्त ४ सोपे उपाय- कडक उन्हाळ्यातही मनी प्लांट राहील हिरवागार, भराभर वाढेल मोठी वेल

हा आंबा तब्बल अडीच ते तीन लाख रुपये डझन या दरात विकला जातो. या आंब्याचं वैशिष्ट्य असं की तो अतिशय गोड असतो. इतर कोणत्याही आंब्यापेक्षा त्याच्यातल्या साखरेचं प्रमाण जास्त असतं. शिवाय हा आंबा पिकविण्याची पद्धतही वेगळीच आहे.

 

हा आंबा पुर्णपणे झाडावरच नैसर्गिक पद्धतीने पिकवला जातो. तो पिकविण्यासाठी कोणत्याही केमिकल्सचा वापर केला जात नाही. आंबा झाडावर असतानाच त्याच्याभोवती एक जाळी लावली जाते.

उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

जेणेकरून आंबा पिकल्यानंतर जेव्हा गळेल तेव्हा तो अलगदपणे त्या जाळीत पडेल आणि त्याला मार लागणार नाही. याशिवाय अतिशय निवडक आणि उच्च दर्जाचे आंबेच विकायला काढले जातात. शिवाय कोणत्या झाडावरचे आंबे विकायचे हे देखील ठरलेले असते. त्यामुळेच हा आंबा एकतर खूप मुबलक नसतो आणि त्याची किंमतही जास्त असते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Miyazaki Mango: World's most expensive mango costs more than gold.

Web Summary : The Miyazaki mango, cultivated in Japan, is the world's priciest. Sold as 'Egg of the Sun', it costs ₹2.5 to 3 lakh per dozen. Its unique sweetness and chemical-free cultivation contribute to its high value.
टॅग्स :सोशल व्हायरलआंबाजपानसमर स्पेशल