कमी वयात चष्मा लागण्याची अनेक कारणं आहेत. याला खराब जीवनशैली किंवा आपल्याला चुकीच्या वाईट सवयी जबाबदार आहेत.(glasses cleaning mistakes) आपल्यालापैकी अनेकांच्या दैनंदिन जीवनशैलीत चष्म्याचा वापर केला जातो.(how to clean spectacles properly) आपण रोज वापरत असलेल्या चष्म्याची स्वच्छता करणं जितकं सोपं वाटतं, तितकंच खरं तर महत्त्वाचं आणि काळजीपूर्वक करण्याची गरज आहे.(eyeglasses care tips)
चष्मा साफ करताना अनेकदा लहान-सहान चुका होतात. ज्यामुळे काचेवर परिणाम होतो आणि आपल्याला अंधूक दिसू लागते.(common mistakes cleaning glasses) ज्याचा आपल्या डोळ्यांवर आणि दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोक कोणत्याही कापडाने किंवा टिश्यूने चष्मा पुसतात.(eyewear maintenance) यामुळे ओरखडे किंवा डाग पडतात. जर आपणही चष्मा वापरत असू तर या ४ चुका करणं टाळा.
1. जेव्हा आपल्याकडे चष्मा पुसण्यासाठी क्लिनिंग क्लॉथ नसतो तेव्हा आपण अनेकदा स्वच्छ करण्यासाठी शर्ट, टी-शर्ट किंवा जीन्स वापरतो. अनेकदा टिश्यू पेपरचा वापर देखील केला जातो. पण यामुळे काचेला ओरखडे पडतात आणि चष्मा खराब होतो.
2. दैनंदिन कामांच्या वेळी चष्मांवर धूळ आणि घाण साचणं सामान्य आहे. बहुतेक लोक चष्मा साफ करण्यासाठी साबण, डिटर्जंट किंवा क्लिनिंग एजंटचा वापर करतात. असं केल्याने चष्माचे कोटिंग खराब होऊ शकतं.
3. बऱ्याचदा चष्मा साफ करताना चुकून घाणेरड्या हातांचा काचेचवर स्पर्श होतो. ज्यामुळे काचेवर तेल किंवा घाण साचते. यामुळे काचेचे नुकसान होऊ शकते.
4. अनेकदा चष्मा साफ करण्यासाठी व्हिनेगर किंवा अल्कोहोलचा वापर करतात. यामुळे काच खराब होतो.
चष्मा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती?
1. चष्मा साफ करताना नेहमी मायक्रोफायबर कापडचा वापर करा. यामुळे काचेचे संरक्षण होते.
2. चष्मा साफ करताना लेन्स क्लीनर वापरा. हे थेंब किंवा स्प्रेच्या स्वरुपात उपलब्ध असतात. यामुळे चष्मा सहज साफ करता येतो.
3. काचेवर खूप धुळ जमा झाली असेल तर सगळ्यात आधी पाण्याने स्वच्छ करा. चुकीच्या पद्धतीने साफ केल्यास काचेचे नुकसान होते आणि डोळ्यांना नुकसान पोहोचवते.