उन्हाळा सुरु झाला की, आपल्या घरात किंवा घराच्याभोवती डास पाहायला मिळतात. ज्यामुळे आजाराचा धोका अधिकच वाढतो.(DIY Mosquito Repellents for Summer) डासांपासून रक्षण करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. केमिकल उत्पादने, अगरबत्तीसारख्या वस्तूंचा वापर करतो.(Home Solutions for Ant and Insect Problems) यामुळे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. याच्यामुळे श्वास घेण्यास अनेक अडचणी येतात. (Insect-Free Home in Summer)
आपल्याही घरात डासांचा त्रास वाढला असेल तर स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करुन आपण डासांना पळवून लावू शकतो.(Simple Hacks to Get Rid of Ants and Mosquitoes) यामुळे नुसते डास घराबाहेर जाणार नाही तर कीटक आणि मुंग्याचा त्रास देखील कमी होईल. लवंग आणि इतर पदार्थांपासून मच्छरांना कसे पळवता येईल पाहूया सोप्या टिप्स. (Best Home Remedies for Mosquitoes and Ants)
1. लवंग-कांदे आणि कापूर
मच्छरांना पळवून लावण्यासाठी आपण ४ ते ५ लवंगा, कांदा, कापूर आणि मोहरीचे तेल घ्यायला हवे. कांद्या घेऊन त्याचा वरचा भाग कापून घ्या. चाकूने होल करुन त्यात तेल भरा. मग यात कापूर आणि लवंग घाला. कापसाची वात बनवून ती तेलात बुडवा आणि जाळा. या घरगुती उपायाने डास निघून जातील.
2. लसूण
डासांना दूर ठेवण्यासाठी लसूण फायदेशीर ठरेल. यासाठी लसूण कुस्करून कपभर पाण्यात ठेवा. १० ते १२ लसणाच्या पाकळ्या घेऊन ते द्रावण एका स्प्रेच्या बाटलीत भरा. घरभर हा स्प्रे फिरवा. याच्या वासामुळे डास मरायला सुरुवात होईल.
3. लिंबू आणि लवंग
डासांपासून सुटका करण्यासाठी अर्धा लिंबू घेऊन त्यात ७ ते ८ लवंगा चिकटवा आणि आपल्या खोलीत ठेवा. लिंबू आणि लवंगाच्या वासामुळे डास निघून जातील. लवंगाचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सि़डंट गुणधर्म आरोग्याला हानिकारक नसतात. यामुळे घरात डास निघून जाण्यासही मदत होईल.