सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणं काही नवीन गोष्ट नाही. पण त्यातील काही व्हिडीओ असे असतात जे आपल्या आयुष्यातील दैनंदिन जीवनाशील जोडले जातात.(Funny mom reaction viral video) त्यामुळे आपण त्यावर अनेकदा प्रतिक्रिया देतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक मुलीने ५० हजारांचा हेअर ड्रायर विकत घेतला आणि तो आपल्या आईला दाखवला.(Desi mom reaction to expensive purchase) किंमत ऐकल्यावर आईने दिलेली प्रतिक्रिया इतकी भन्नाट होती की व्हिडीओ पाहणारे म्हणाले ही तर माझीच आई. (Daughter buys expensive item reaction)
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @awwwnchal या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ मुलगी मोठ्या उत्साहात डायसन हेअर ड्रायर उघडताना दिसतेय. तिची आई तिला विचारते. हेअर ड्रायरची किंमत किती आहे? त्यावर मुलगी उत्तर देते, ५० हजार रुपये... त्यावर तिची आई बोलते की डोक्यावर इतके केस नाही आणि तू हेअर ड्रायर विकत घेतला.
केस गळून टक्कल पडलं? ७ भन्नाट टिप्स – केसांचं गळणं होईल बंद, वाढतील दुप्पट वेगाने!
या व्हिडीओला आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. एका युजर्सने कमेंट केली की उत्पादन किती चांगलं असलं तरी, आई नेहमीच आपल्याला जमिनीवर आणून ठेवते. दुसऱ्या युजर्सने सांगितलं की, हेअर ड्रायरसाठी ५० हजार रुपये खर्च करणं हा वेडेपणा आहे. तिसऱ्या युजर्सने कमेंट केली की, भारतीय आईला किंमत ठरवायला हवी. त्यातील एका युजर्सने असं म्हटलं की मी घरात कोणतीही वस्तू आणली की, माझी आई देखील असंच काहीसं म्हणते.
अशा प्रकारचे रिलेटेबल कंटेंट सोशल मीडियावर पटकन ट्रेंड होतात. यामुळे घरातलं वास्तव सहज कळतं. महागड्या वस्तूंबद्दल पालकांची काळजी, बचत करण्याची मानसिकता आणि मुलांच्या बदलत्या लाइफस्टाइल यावर हलकीफुलकी गंमत पाहायला मिळते.