कचरा म्हटलं की अनेकांची डोकेदुखी, दुर्गंधी आणि आजार असंच अनेकांना वाटतं. पण भारतात असं एक गाव आहे.(garbage buying app India) जिथे कचरा फेकला जात नाही तर विकत घेतला जातो. कचऱ्यासारखी साधी गोष्ट खरेदी करण्यासाठी लोक पैसे देतात. याची कधी कल्पना देखील करु शकत नाही. या गावात घराघरांतून निघणारा ओला आणि सुका कचरा लोक पैसे देऊन देत नाहीत, तर उलट त्यांना कचऱ्याचे पैसे मिळतात.(household waste mobile app) विशेष म्हणजे यासाठी मोबाईल ॲपचा वापर केला जातो.
त्वचा गोरी असो वा सावळी, प्रत्येक महिलेच्या कपाटात 'हे' ५ रंग असायलाच हवे , सौंदर्य येईल खुलून..
बिहारमधील सिवानमधील लखवा ग्रामपंचायतीमधील ही गोष्ट. घराघरातील कचरा मोबाईल ॲपद्वारे खरेदी केला जातो. हे लोहिया स्वच्छ बिहार अभिमायन (LSBA) या योजनेअंतर्गत केले जात आहे. स्वच्छतेकडे वाटचाल करण्यासाठी ही एक चांगली योजना मानली जात आहे.
या ॲपला कबाड मंडी असं नाव देण्यात आलं. गावकरी त्यांच्या घरातील कचरा ॲपवर ऑनलाइन पद्धतीने नोंदवतात. त्यानंतर काही लोक घरी जाऊन कचऱ्याचे वजन करतात आणि त्यानुसार पैसे देखील दिले जातात. कचरा विकत घेण्यापासून ते पैसे देण्यापर्यंत सर्व काही ॲपवर अवलंबून असते.
हा कचरा गोळा करुन त्याचे पुनर्वापर करुन उपयुक्त वस्तू बनवल्या जातात. याचा वापर पिशव्या, बाटलीच्या पिशव्या, कॅरी बॅग्ज आणि डायरीसारख्या वस्तू बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. लखवा गावात निर्माण होणारा कचरा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट (PWMU) आणि कचरा प्रक्रिया युनिट (WPU) मध्ये नेला जातो, जिथून पुढील प्रक्रिया सुरू होते.
हिंगातली भेसळ ओळखा १ मिनिटांत, हिंगाचा गंध असलेला भुसा तुम्ही स्वयंपाकात वापरताय-तपासा चटकन..
या कचऱ्याचे फारसे मूल्य नाही. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही गोष्ट चांगली मानली जाते. स्वच्छ भारत अभियान तर्फे हे अभियान सुरु करण्यात आले. याचा अंमलबजावणीमुळे सार्वजनिक स्वच्छतेच्या वर्तनात बदल झाला आहे. तसेच मोबाईल ॲपमुळे कचऱ्याची पूर्ण प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. कोणत्या घरातून किती कचरा घेतला, त्याचे किती पैसे मिळाले, कोणत्या प्रकारचा कचरा जास्त आहे. हे सगळं ॲपवर दिसतं. यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढली असून स्पर्धाही निर्माण झाली आहे.
