Join us

‘माहवारी की जानकारी बदलेगी सोच हमारी!’ -नव्या नवेली नंदानं भिंत रंगवत सांगितली एकच गोष्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 16:10 IST

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा मोकळेपणानं बोलते, सांगते लिंगसमभाव आणि समानतेविषयी..

ठळक मुद्दे मासिक पाळीसंदर्भात उघड, मोकळेपणानं बोलण्याची गरज

नव्या नवेली नंदा. अमिताभ बच्चन यांची नात. ना ती अभिनय करते, ना सेलिब्रिटी आहे रुढार्थाने. पण तरी ती बातम्यांसह समाजमाध्यमात कायम चर्चेत असतेच. कधी तिच्या शर्टवरचा मेसेज तर कधी तिच्या कथित प्रेमप्रकरणांची चर्चा. तर कधी तिचा फॅशन सेन्स. मात्र  सामाजिक जनजागृतीचे तिचे प्रयत्नही वाखाणण्यासारखे असतात. वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजिन डेच्या निमित्तानं (menstrual hygiene day 2022)  तिनं एक पोस्ट शेअर केली. आणि त्यात ती भिंतीवर चित्र काढतेय. मासिक पाळीसंदर्भात उघड, मोकळेपणानं बोलण्याची गरज अधोरेखित करतेय.पोस्टमध्ये नव्या नंदा म्हणते, जगभर मेन्स्ट्रुअल हायजिन डे साजरा होतोय, त्यानिमित्तानं भिंतीवर मी हे चित्र काढतेय. आमचा प्रयत्न आहे की सार्वजनिक स्तरावरही मोकळेपणानं मासिकपाळी संदर्भात बोलता यावं.  ‘माहवारी की जानकारी बदलेगी सोच हमारी’.

नव्या नंदा केवळ मासिक पाळीच नाही तर लिंगसमानता, यासह लहानसहान गोष्टीत नसलेला लिंगसमभाव यासंदर्भातही कायम मोकळेपणानं बोलताना दिसते. मध्यतंरी घरकामासंदर्भात तिची मतंही बरीच गाजली. आपल्या घरात जितकी सहज मला कामं सांगितली जातात तितकी भावाला सांगितली जात नाही कारण तशी आपल्या घरांची मानसिकता असते असं तिनं मोकळेपणानं सांगितलं होतं.

टॅग्स :नव्या नवेलीमासिक पाळीचा दिवस