Join us

बघा आईची माया!! मुलाला ३१ हजारांचं ब्रॅण्डेड स्वेटर घेणं परवडत नव्हतं म्हणून आईने चक्क....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2025 13:58 IST

Social Viral: लेकरासाठी आई काहीही करू शकते, हेच पुन्हा एकदा दाखवून देणारी एक खरीखुरी गोष्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. 

ठळक मुद्देतब्बल ३१ हजार रुपये किंमत असणारं ते स्वेटर त्याला खूप इच्छा असूनही अजिबातच परवडणारं नव्हतं. 

आईच्या मायेला काही मोल नसतं हेच खरं.. जगातली कोणतीही व्यक्ती आईसारखं प्रेम आपल्यावर करू शकत नाही. लेकरासाठी अगदी काहीही करण्याची आईची तयारी असते. हे आपल्या स्वत:च्या अनुभवातून किंवा आजुबाजुच्या प्रसंगातून आपण नेहमीच बघत असतो. अशीच आईच्या प्रेमाची महती सांगणारी एक खरीखुरी गोष्ट सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एका मुलाला एका नामांकित ब्रॅण्डचं अतिशय महागडं स्वेटर घेण्याची खूप इच्छा होती. पण त्याला ते शक्य होत नव्हतं. त्यासाठी त्याच्या आईने नेमकं काय केलं ते पाहा..

 

संदीप मॉल असं त्या मुलाचं नाव असून त्याने स्वत:च त्याच्या आईने त्याच्यासाठी काय केलं, याविषयीची पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. यामध्ये तो असं सांगतो आहे की त्याला मागच्या कित्येक वर्षांपासून राल्फ लॉरेन (Ralph Lauren) या ब्रॅण्डच्या एका स्वेटरची डिझाईन, त्याचा रंग खूप आवडलेला होता.

नकळतपणे वजन, शुगर वाढविणारे ५ पदार्थ, गोड खाणं टाळता पण 'हे' पदार्थ खातानाही विचार करा

त्याला ते स्वेटर घेण्याची जबरदस्त इच्छा होती. पण आता राल्फ लॉरेन हा एक मोठा ब्रॅण्ड असल्याने साहजिकच स्वेटरची किंमत खूप जास्त होती. तब्बल ३१ हजार रुपये किंमत असणारं ते स्वेटर त्याला खूप इच्छा असूनही अजिबातच परवडणारं नव्हतं. 

दूरचं धुसर दिसतं? योगशास्त्रात सांगितलेल्या ४ सोप्या गोष्टी करून पाहा, नजर होईल तेज

त्याच्या आईला ही गोष्ट जेव्हा समजली, तेव्हा तिने त्या स्वेटरचा रंग, डिझाईन असं सगळं व्यवस्थित निरखून पाहिलं आणि जसंच्या तसं स्वेटर आपल्या लेकासाठी विणलं. ते स्वेटर पाहून अर्थातच मुलाला अतिशय आनंद झाला असणार. त्याच आनंदात त्याने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये एकीकडे त्याला जे घ्यायचं होतं त्या स्वेटरचा फोटो टाकला आहे आणि दुसरीकडे त्याच्या आईने विणलेल्या स्वेटरचा फोटो शेअर केला आहे. आईने मायेने विणलेल्या स्वेटरची किंमत राल्फ लॉरेनपेक्षाही कितीतरी जास्त आहे, अशा आशयाच्या काही कमेंट त्याला आल्या आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरल