Join us

हे काय भलतंच!! बायको गरोदर आणि नवऱ्यानेच केलं प्रेग्नन्सी फोटोशूट, असं का? बघा तो काय सांगतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2022 19:20 IST

Pregnancy Photo Shoot Of a Man: बघा हे काय आता भलतंच आहे.... बायको गरोदर आणि प्रेग्नन्सी फोटोशूट करतोय नवरा (pregnancy photo shoot by husband), हे विचित्र फोटो पाहून अनेक जणांनी कपाळाला हातच मारून घेतला.

ठळक मुद्देएखादी गरोदर स्त्री ज्याप्रमाणे स्वत:चे फोटो काढते, त्याप्रमाणे मस्तपैकी ते स्वत:चे छान छान फोटो काढत आहेत.

ऐकावं ते नवलच... असं म्हणून हसण्याची किंवा डोक्याला हात मारून घेण्याची वेळ सोशल मिडियावरचे फोटो (viral photos) आणि व्हिडिओ बघून बऱ्याचदा येते. कधी कधी ते फोटो पाहून हसता हसता पुरेवाट होऊन जाते. तर कधी कधी हा असा देखील फोटो बघावा लागतो. बायको गरोदर आहे, पण प्रेग्नन्सी फोटोशूट मात्र नवरा करतो आहे (pregnancy photo shoot by husband). हा व्हिडिओ तसा दोन वर्षे जुना आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये हा व्हिडिओ पहिल्यांदा व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालतो आहे. (Man did pregnancy or maternity photo shoot)

 

Bittu Sharma Jokes या फेसबूक पेजवरून हा फोटो आता पुन्हा एकदा शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं दिसत आहे की चक्क एक नवराच त्याच्या बायकोच्या ऐवजी प्रेग्नन्सी फोटो शूट करतो आहे. त्या व्यक्तीला भरपूर ढेरी आलेली असल्याने एखाद्या प्रेग्नंट बाईचं जेवढं पोट दिसेल, तेवढंच त्यांचं पोट दिसत आहे. निळ्या रंगाचा स्कर्ट, पांढरं ब्लाउज आणि डोक्यावर फुलाफुलांचा क्राऊन अशी वेशभुषा त्यांनी केली आहे. आणि एखादी गरोदर स्त्री ज्याप्रमाणे स्वत:चे फोटो काढते, त्याप्रमाणे मस्तपैकी ते स्वत:चे छान छान फोटो काढत आहेत.

 

त्यांनी असं का केलं?हा प्रश्न कुणालाही पडणं अगदी साहजिक आहे. कारण बाप कितीही हौशी असला तरी तो असं एकटाच प्रेग्नन्सी फोटोशूट कधीच  करत नाही. त्याच्या बायकोसोबत वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो काढतो आणि त्यात काहीच वावगं नाही. पण या काकांनी स्वत:च प्रेग्नन्सी फोटो शूट करण्याचं कारण मात्र खूपच वेगळं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की बायको ऐनवेळी फोटोशूट करायला नाही म्हणाली. सगळी तयारी झालेली होती. फोटोग्राफर आलेला होता. मग एवढी तयारी वाया का घालवायची म्हणून हे गृहस्थ स्वत:च पुढे झाले आणि त्यांनी फोटो शूट केले. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल फोटोज्गर्भवती महिला