Join us

खोटे दागिने मळकटले ? डागाळलेले आणि काळे झालेले दागिने पुन्हा चमकवा , करा हे ४ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 15:54 IST

Make tarnished and blackened jewelry shine again, do these 4 easy solutions : खोटे दागिने साफ करायची सोपी पद्धत.

सोन्या चांदीचे दागिने सोनाराकडून स्वच्छ छान धुऊन आणता येतात. मात्र असे खरे दागिने आपण रोजसाठी वापरत नाही. खोटे दागिने जास्त वापरले जातात. अगदी १० रुपयांपासून हजारापर्यंत खोट्या दागिन्यांची किंमतही असतेच. काही दिवसातच कानातले, गळ्यातला हार, बांगड्या जरा कळकट दिसायला लागतात. त्याची शोभा जाते. ( Make tarnished and blackened jewelry shine again, do these 4 easy solutions)खोटी ज्वेलरी ही वापरण्यास आकर्षक आणि स्वस्त पर्याय असते, पण तिची चमक टिकवणे मात्र थोडे अवघड असते. धुळीमुळे, घामामुळे किंवा हवेशी संपर्क आल्याने तिचा रंग बदलतो किंवा ती काळसर दिसू लागते. अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास ही ज्वेलरी पुन्हा चमकदार करता येते. 

१. सर्वात सोपा उपाय म्हणजे साध्या साबणाच्या पाण्यात कानातले वगैरे बुडवून ठेवायचे. काही तास बुडवून ठेवा नंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ घासायचे. मऊ ब्रशने स्वच्छ करा म्हणजे दागिन्यांवर ओरखडे दिसणार नाही. यामुळे ज्वेलरीवरचा मळ, धूळ आणि घामाचे डाग सहज निघून जातात. 

२. दुसरा उपाय म्हणजे टूथपेस्टचा वापर करा. थोडीशी टूथपेस्ट घेऊन हलक्या हाताने ज्वेलरीवर घासल्यास ज्वेलरीवरील मळ निघते आणि नव्यासारखी दिसायला लागते. गेलेला चमकदारपणा परत येतो. ज्वेलरी धुतल्यानंतर कोरड्या, मऊ कापडाने चांगली पुसणे महत्त्वाचे असते. पाणी तसेच रहीले तरी पुन्हा खराब होते.

३. तिसरा उपाय म्हणजे बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण वापरता येते. हे मिश्रण पेस्टसारखे करून ज्वेलरीवर हलकेसे चोळावे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे दागिना कितीही काळा झाला असला तरी तो पुन्हा चमकतो. डाग कमी होतात. 

४. चौथा सोपा उपाय म्हणजे व्हिनेगरचा वापर. थोड्या व्हिनेगरमध्ये ज्वेलरी काही मिनिटे ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुतल्यास तिची जुनी चमक परत येते. मात्र दागिने अतिवेळ मिश्रणात राहीले तर ज्वेलरीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. या सगळ्या उपायांनी खोटी ज्वेलरी पुन्हा नवीसारखी दिसते आणि वापरायला अधिक काळ टिकते. ज्वेलरी वापरल्यानंतर तिला कोरड्या पिशवीत ठेवणे आणि सुगंधी क्रीम, परफ्युमपासून दूर ठेवणे हे तिची चमक दीर्घकाळ टिकवण्यासाठी उपयुक्त ठरते.

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीमहिलासोशल व्हायरल