धुरंदर चित्रपटातील काही सीन हे वादग्रस्त ठरले खरे पण त्यातील एका गाण्याने सगळ्यांना वेड लावलं. रेहेमान डकेतच्या गाण्यावर अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाचेच पाय थिरकलेले पाहायला मिळत आहे.(viral dance video) सोशल मीडियावर सतत नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण काही व्हिडिओ असेही असतात जे पाहणाऱ्यांना हसवतात, आश्चर्यचकित करतात आणि कधी कधी थक्कही करतात.(child dance video viral) असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यात एक छोटासा चिमुकला धुरंदर चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतोय.(Dhurandhar song dance) धुरंदर चित्रपटातील काही सीन वादात असले तरी, या गाण्याची एनर्जी आणि लय लोकांच्या मनावर घर करते.
व्हिडिओमध्ये चिमुकला धुरंदरमधील FA9LA गाण्याच्या तालावर परफेक्ट स्टेप्स करताना दिसतो. त्याचे कमालीचे हालचाली आणि एक्सप्रेशन इतके छान आहे की अनेकांना कमेंट्स केल्या हा AI व्हिडीओ आहे. मुलाच्या हालचाली इतक्या परफेक्ट आहेत की इतक्या लहान वयात स्टेप्स करणं खरं तर कठीणच.
पार्थ हा २ वर्षे २ महिन्यांचा आहे. इतक्या लहान वयातही त्यांने परफेक्ट डान्स केल्यामुळे अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @baby_parthu या हँडलवरून "रहमान डाकू" या कॅप्शनसह पोस्ट करण्यात आला. आतापर्यंत त्याला ३८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि २.२ दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टला १०,००० हून अधिक कमेंट्स देखील मिळाल्या आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करत काहींनी म्हटले, लहान वयात इतक्या परफेक्ट स्टेप्स! तर काही जण हसत म्हणाले, हा तर खरा कलाकार आहे, AI ची गरजच नाही! व्हिडिओने काही मिनिटांत लाखो व्ह्यूज आणि हजारो शेअर मिळवले आहेत, आणि अनेक युजर्स त्याला रील्स आणि स्टोरीजवर शेअर करताना ‘फायर डान्स’, ‘किड स्टार’, ‘मजेशीर परफॉर्मन्स’ असा हॅश टॅगचा वापर करत आहे.
