लिली पॅडिंग हा शब्द सध्या कामाच्या ठिकाणी विशेषत: जेन-झी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेंड होताना दिसत आहे. याचा अर्थ असा की एकाच कंपनीत जास्त काळ राहण्याऐवजी, तरुण नवीन कौशल्ये शिकण्यासाठी आणि चांगल्या संधीच्या शोधात वेळोवेळी नोकऱ्या बदलतात.(Lily Padding) आजचे तरुण फक्त काम करण्यासाठी काम करत नाहीत तर जाणूनबुजून करिअरमध्ये बदल करत आहेत.(Lily Padding meaning) वर्षानुवर्षे एकाच कंपनीत राहण्याऐवजी, अनेक जनरेशन झेड व्यावसायिक नवीन कौशल्ये, चांगल्या संधी मिळविण्यासाठी आणि वाढीला गती देण्यासाठी वेळोवेळी नोकऱ्या बदलण्याचा पर्याय निवडत आहेत. या ट्रेंडला आता "लिली पॅडिंग" म्हटले जात आहे. याचा अर्थ त्यांच्या करिअरमध्ये लहान, नियोजित पावले उचलणे. पण प्रश्न असा आहे की हा दृष्टिकोन भारताच्या जनरेशन झेडसाठी नवीन करिअरचे धोरण बनत आहे का? (Workplace trends 2026)
लिली पॅडिंग ही करिअर नियोजनची पद्धत आहे. ज्यामध्ये तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन कौशल्य आणि अनुभव मिळवण्यासाठी वेळोवेळी नोकऱ्या, उद्योगधंदे किंवा पद बदलावे लागते. आधी करिअर म्हणजे एकाच कंपनीत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. पण या ट्रेंडमुळे सतत काही तरी नवीन शिकणं आणि विविध कामाच्या वातावरणाचा अनुभव घेण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या अनेक तरुण, व्यावसायिक त्यांच्या करिअरकडे सरळ मार्ग म्हणून पाहात नाहीत.
सध्या AI आणि ऑटोमेशन वेगाने विकसित होताना दिसत आहे. यामागे असलेल्या तंत्रज्ञानामुळे अनेक कंपन्यांमध्ये आवश्यक असणारे कौशले देखील सतत बदलताना पाहायला मिळताय. यासाठी अनेक व्यावसायिक नवीन कौशल्ये शिकण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी नवीन नोकऱ्या किंवा कंपन्यांकडे जात आहेत. तर सध्याची तरुण पिढी करिअर ग्रोथ आणि कौशल्य विकासावर भर देत आहे. तसंच रिमोट वर्क, गिग इकॉनॉमीमुळे तरुणांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच विविध क्षेत्रे आणि संधी एक्सप्लोर करण्याची संधी मिळत आहे. म्हणूनच लिली पॅडिंगचा ट्रेंड वेगाने वाढत आहे.
या ट्रेंडचा परिणाम सध्या भारतात स्पष्टपणे पाहायला मिळतोय. विशेषतः तंत्रज्ञान, डिजिटल सेवा, मार्केटिंग आणि स्टार्टअप्समध्ये. तरुण पिढी झपाट्याने नोकऱ्या बदलण्यावर आणि नवीन गोष्टी शिकण्यावर, तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहेत. कॉर्पोरेट तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हा बदल नोकरीच्या स्थिरतेपेक्षा रोजगारक्षमता आणि कौशल्य विकासावर वाढता भर दर्शवितो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि भूमिकांमध्ये काम करून, ते त्यांच्या कौशल्यांना वाव देत आहेत, ज्यामुळे असंख्य फायदे मिळतात. वारंवार नोकरी बदलल्याने त्यांना कौशल्ये जलद शिकता येतात आणि त्यांचे पगार देखील वाढतात.
