दिवाळीच्या आधी आपण संपूर्ण घराची स्वच्छता करतो, पण घरातील एक भाग अनेकदा दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे बाथरूम. बाथरूममध्ये असलेले पाण्याचे हट्टी डाग, साबणाचे थर आणि टाइल्समधील काळेपणा काढणे ,म्हणजे मोठे कठीण आणि किचकट, वेळखाऊ काम...बाथरूममधील डाग, पिवळेपणा आणि साबणाच्या थरांमुळे ते कितीही धुतलं तरी स्वच्छ दिसत नाही. अशावेळी महागड्या केमिकल क्लिनर्सऐवजी घरातच असलेला नैसर्गिक उपाय म्हणजे लिंबाचा वापर... लिंबामध्ये असलेले सिट्रिक अॅसिड हे नैसर्गिक क्लिनिंग एजंट म्हणून काम करतं. ते फक्त डाग आणि पिवळसर थर नाही तर बाथरुममधील कुबट दुर्गंधही दूर करतं(how to remove stains from bathroom using lemon).
लिंबाचा वापर केल्याने टाइल्स, नळ, सिंक आणि शॉवर एरिया चमकदार होतो आणि बाथरूममध्ये एक प्रकारचा फ्रेशनेस येतो. शिवाय यासाठी कुठलेही हानिकारक रसायन किंवा महागडे क्लिनर्स वापरावे लागत नाही. दिवाळीपूर्वी फक्त लिंबाच्या मदतीने बाथरूम कसे स्वच्छ, चमकदार आणि सुगंधी बनवता येईल आणि त्यासाठी कोणते सोपे घरगुती (lemon cleaning hacks for bathroom) उपाय करता येतील ते पाहूयात...
लिंबू वापरून बाथरूम स्वच्छ करण्याच्या पद्धती...
१. लिंबू आणि मीठ :- बाथरूमच्या टाइल्सवर पाण्याचे पांढरे डाग जमा झाले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरते. अर्धा लिंबू घ्या आणि त्यावर थोडे मीठ टाका. आता हे थेट डाग असलेल्या भागावर घासा. मीठ स्क्रबचे काम करेल आणि लिंबातील अॅसिड डाग काढून टाकेल. ५ ते १० मिनिटांनंतर पाण्याने धुवा. तुमच्या टाइल्स नव्यासारख्या चमकताना दिसतील.
आजीआजोबांच्या सहवासात वाढलेल्या मुलांमध्ये असतात ६ गुण! मायेसोबतच मिळते जीवाभावाची मैत्रीही...
२. लिंबू आणि बेकिंग सोडा :- शॉवर आणि सिंकवर अनेकदा साबणाचे हट्टी डाग (जिद्दी दाग) जमा होतात. एका वाटीत बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडे लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट स्पंजच्या मदतीने डागांवर लावा आणि १५ मिनिटांसाठी सोडून द्या. त्यानंतर हलक्या हातांनी घासून धुवा. तुमचा शॉवर आणि सिंक अगदी नव्यासारखा चमकेल.
३. लिंबू आणि व्हिनेगर :- नळ आणि शॉवरहेडवर अनेकदा पाण्यातील क्षारांचे पांढरेशुभ्र थर जमा होतात. एका स्प्रे बॉटलमध्ये सम प्रमाणात लिंबाचा रस आणि व्हिनेगर मिसळा. हे द्रावण नळांवर आणि शॉवरहेडवर स्प्रे करा. १० मिनिटांनंतर ब्रशने घासून पाण्याने धुवा. व्हिनेगर आणि लिंबू एकत्र मिळून गंज आणि क्षारांचे पांढरेशुभ्र थर सहजपणे काढतील.
४. लिंबाच्या सालींचा स्क्रब :- लिंबू पिळून झाल्यावर त्याच्या साली फेकू नका. या सालीच्या आत थोडीशी टूथपेस्ट किंवा मीठ घालून टॉयलेट सीट आणि कमोडवर घासा. यामुळे डाग तर जातीलच, पण बाथरूममधील कुबट दुर्गंधीही दूर होईल. त्यानंतर फक्त पाणी टाकून फ्लश करा.
५. लिंबू आणि डिशवॉश :- बाथरूमच्या फरशीवर जास्त चिकटपणा जाणवत असल्यास, एका बादलीत २ चमचे डिशवॉश आणि अर्धा लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाने फरशी धुऊन घ्या. यामुळे फरशीवर जमा झालेला चिकटपणा आणि घाण दूर होईल आणि एक छान हलका सुगंधही पसरेल.