Join us

काळेकुट्ट किचन टॉवेल एका धुण्यातही होतील स्वच्छ! गरम पाण्यात मिसळा १ पदार्थ - दिसतील नव्यासारखे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2025 19:01 IST

how to clean dirty kitchen towels at home : home remedies to clean greasy kitchen towels : remove grease and oil from kitchen towels : किचन टॉवेल पुन्हा एकदा नव्यासारखे स्वच्छ, मऊ करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय...

किचनमधील सर्वात महत्वाच्या आणि गरजेच्या वस्तूंपैकीच किचन टॉवेल, नेहमीच्या वापरातील वस्तू... स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी आणि तितकीच दुर्लक्षित वस्तू म्हणजे किचन टॉवेल. हे किचन टॉवेल स्वयंपाकादरम्यान हात पुसण्यासाठी, तेलकट भांडी पुसण्यासाठी किंवा गॅसची ओट्याची जागा स्वच्छ करण्यासाठी सतत वापरले जातात. परिणामी, काही दिवसांतच या टॉवेलवर तेल, मसाले आणि अन्नाचे कण साचून चिकट, मेणचट आणि कळकट थर  तयार होतो(home remedies to clean greasy kitchen towels).

हे काळेकुट्ट आणि चिकट डाग, टॉवेल कितीही साबणाने धुतले, तरी  चिकटपणा आणि दुर्गंधी सहजासहजी जात नाही. अशावेळी, टॉवेल फेकून देण्याऐवजी, काही सोपे आणि घरगुती उपाय वापरून आपण त्यांना पुन्हा नव्यासारखे आणि चमकदार करु शकतो.किचन टॉवेल पुन्हा एकदा नव्यासारखे स्वच्छ, मऊ करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय पाहूयात. फारशी मेहेनत न (remove grease and oil from kitchen towels) घेता किंवा न घासतात तेलकट, मळकट किचन टॉवेल स्वच्छ करण्याचा झटपट उपाय पाहूयात. 

तेलकट, मळकट, काळेकुट्ट किचन टॉवेल कसे स्वच्छ करावे... 

तेलकट, मळकट, काळेकुट्ट किचन टॉवेल स्वच्छ करण्यासाठी आपल्याला गरम पाणी, तुरटीचा छोटा तुकडा, लिंबाच्या साली, शाम्पू आणि लिक्विड किंवा डिटर्जंट पावडर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

वॉटर फिल्टरमध्ये घाण साचली ? घरगुती उपायाने मिनिटांत करा स्वच्छ - दर महिन्याच्या क्लिनिंग सर्व्हिसचा खर्च वाचेल... 

सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळवून घ्या. आता या गरम पाण्यात बारीक केलेली तुरटीची पावडर, लिंबाची सालं आणि शाम्पू  टाकून ते चांगले मिसळून घ्या. या तयार झालेल्या द्रावणात किचनमधील तेलकट, चिकट टॉवेल टाकून १५ ते २० मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या. १५ ते २० मिनिटांनी आपण पाहू शकता की किचन टॉवेलवरील चिकट, मेणचट थर निघून पाण्यांत उतरलेला असेल. आता टॉवेल बाहेर काढून हलक्या हातांनी चोळा  आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 

घरभर डास- माशा घोंगावतात, चावतात? घरीच करा १ जादुई दिवा - फक्त वात पेटवा आणि पाहा कमाल...  

हा उपाय इतका परिणामकारक आहे की, गरम पाणी तेलाला विरघळवते. लिंबामधील अ‍ॅसिड चिकट - मेणचटपणा काढून टाकतात. तुरटी उत्कृष्ट क्लीनिंग एजंटचे काम करते. या सोप्या आणि खिशाला परवडेल अशा सोप्या उपायाने तुमच्या किचनचे टॉवेल फक्त पूर्णपणे स्वच्छ होण्यासोबतच त्यातून येणारी दुर्गंधी  देखील नाहीशी होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Clean greasy kitchen towels easily with this simple home remedy.

Web Summary : Revive dirty kitchen towels! Soak in hot water with alum, lemon peels, and shampoo. This dissolves grease and removes odors, leaving them clean and fresh.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी