Join us  

एक्झॉस्ट फॅन चिकट - कळकट झालाय? घरी बनवलेला हा खास स्प्रे मारा, स्वच्छ-नवाकोरा दिसेल फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 3:21 PM

Kitchen Exhaust Fan Cleaning Homemade Spray : एक्झॉस्ट फॅन साफ करण्याआधी स्विच बंद असेल याची खात्री करा. किचनमधील एक्झॉस्ट फॅन  रिमुव्हेबल  फिल्टर्ससह असतात.

किचनमध्ये (Kitchen Hacks) प्रॉपर व्हेंटिलेशन नसेल तर जेवण बनवताना ठसका लागतो किंवा फोडणीच्या धुराने खोकला येतो. अनेकदा अनेकदा उष्णता  इतकी वाढते की घरात जेवण बनवणंच कठीण होतं. म्हणूनच जास्तीत जास्त लोक घरा एग्जॉस्ट फॅन बसवण्याचा प्रयत्न करता. (Kitchen Exhaust Fan Cleaning Homemade Spray) जेणेकरून ऊन्हाचा  जास्त त्रास होणार नाही.  याशिवाय जेवण बनवतात मोल्ड जमा होत नाही.

काहीवेळा फॅनचं स्टॅण्ड सहज स्वच्छ करता येतात पण फॅन स्वच्छ करणं कठीण होतं. अशा स्थितीत काही क्लिनिंग टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात. ज्यामुळे फॅन सहज स्वच्छ होऊ शकतो. तुम्हीसुद्धा काही सोप्या क्लिनिंग टिप्सचा वापर करून घर चकचकीत स्वच्छ ठेवू शकता. (Home Hacks & Tips)

एग्जॉस्ट फॅन साफ करण्याआधी स्विच बंद असेल याची खात्री करा. किचनमधील एक्जोस्ट फॅन  रिमुव्हेबल  फिल्टर्ससह असतात. (Best Kitchen Exhaust  Fan Cleaning Homemade Sprey)  ते वेगळे करून तुम्ही फॅन स्वच्छ करू शकता. सिंक किंवा बेसिनमध्ये कोमट पाणी भरून ठेवा. त्यात डिश वॉशचे काही थेंब घाला. साबणाच्या पाण्यात काहीवेळ बुडवू ठेवा. १० ते १५ मिनिटं तसंच भिजवलेले राहू द्या. नंतर स्पंजच्या साहाय्याने व्यवस्थित धुवून घ्या.

1) लेमन स्प्रे

एका भांड्यात पाणी घेऊन पाण्यात लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा, त्यात बेकिंग सोडा टाका, नीट मिसळा आणि काही वेळ सेट होण्यासाठी सोडा. साधारण ५ मिनिटे सेट झाल्यावर स्प्रे बाटलीत भरा. लॅव्हेंडर तेल सुगंधासाठी वापरू शकता.आता पंखा स्वच्छ करण्यासाठी या स्प्रेचा वापर करा.

वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल

2) ग्लिसरिन आणि कोल्डड्रींक्स

ग्लिसरीनपासून क्लिनर बनवण्यासाठी प्रथम एक बाटली घ्या. त्यात व्हिनेगर घालून मिक्स करा. नंतर त्यात लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि तेल सारखे इतर साहित्य घाला आणि एका बाटलीत ठेवा. जर तुम्हाला हे क्लिनर वापरायचे असेल तर ते वापरण्यापूर्वी ते चांगले मिसळा.

चपाती खाता पण भाताशिवाय पोटच भरत नाही? वेट लॉससाठी भात की चपाती काय उत्तम-पाहा

3) बेकींग सोडा

सगळ्यात आधी रिकामी बाटली घ्या आणि त्यात बेकिंग सोडा आणि लिंबू, कोमट पाणी हे साहित्य टाका. चांगले मिसळा आणि बाटलीत चांगले ठेवा. स्वच्छ करण्यासाठी, पंख्यावर लावा आणि 10 मिनिटे सोडा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचा पंखा पूर्णपणे स्वच्छ झालेला दिसेल.

टॅग्स :सोशल व्हायरल